जागतिक मराठी दिन सप्ताहानिमित्त ग्रंथदिंडीद्वारे जनजागृती

श्री. अरुण बारसागडे , जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

तळोधी (बा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

“सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर” द्वारा आयोजित राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू स्वच्छता अभियान (वर्षं १० वे ) जागतिक मराठी दिन सप्ताह, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी अवतरण दिन महोत्सव व श्री गोविंद प्रभू जन्मोत्सवानिमीत्य विविध कार्यक्रमांचे आयोजन दि.२८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान श्री दत्तात्रेय प्रभू मंदिर तळोधी (बा) ता.नागभिड जि.चंद्रपूर येथे करण्यात आले.

रविवार दि.२८ आगष्ट ला संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महानुभाव धर्मप्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुमार्‍या १२ व्या शतकात संस्कृतची मिरासदारी मोडीत काढत मराठी ला देववाणी व धर्मभाषेचा दर्जा देऊन गौरव केलेला होता. त्यानंतर महानुभावांनी मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र व साडेसहा हजार अशी विपूल ग्रंथसंपदा निर्माण करून मराठी भाषेचे संवर्धन केलेले होते. त्यांच्या या कार्याचे स्मरण करून जागतिक मराठी दिन सप्ताहानिमीत्य दि.८ सप्टेंबर ला लीळाचरित्र ग्रंथाचा सन्मान करण्यासाठी ग्रंथदिंडी, पालखी व मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली. तसेच आठवडाभर लीळावाचन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, भक्तीगित गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दि.८ सप्टेंबर ला श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव सोहळा व बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी डॉ.नितेश रामटेके श्री गोविंद प्रभू महाविद्यालय तळोधी (बा),प.पू.ई.श्री.नरेंद्रमूनी पंजाबी, श्री.छत्रपती शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दि.९ सप्टेंबर ला सामुदायिक प्रायश्चित्त विधी करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.