श्री.विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
जंगल परिसरिती गावा सिमे लगत जारीचे कुंपन करा तसेच आगार व्यवस्थापकानी तत्काळ विद्यार्थ्यांन करीता बस सुरू करा
देसाईगंज-
तालुक्यातील उसेगाव जंगल परिसरात ८ सप्टेंबर २०२२ च्या सकाळी काही कामानिमित्ताने आपल्या सवंगड्यासोबत जंगलात गेलेल्या प्रेमलाल तुकाराम प्रधान या ४५ वर्षीय ईसमावर जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले.घरच्या कमावत्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याने कुटुंबावर आलेल्या अचानक संकटातून सावरण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रधान कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत केली.
१४ एप्रिल २०२२ रोजी उसेगावच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात कुरुड येथील मधुकर मेश्राम यांना जीव गमवावा लागल्यानंतर २० दिवसाच्या अंतरातच तालुक्यातील चोप येथील अजित सोमेश्वर नाकाडे या युवकाचा पट्टेदार वाघाने हल्ला करून जीव घेतला होता.तब्बल चार महिण्यानंतर सिटी-१ या वाघाने देसाईगंज तालुक्याच्या जंगलात पुनरागमन करून प्रेमलाल प्रधान या ईसमाचा बळी घेतला.सातत्याने वाघाच्या हल्ल्यात ठार होत असल्याच्या घटना पाहु जाता नागरिकांनीही आता उचित काळजी घेणेच हिताचे ठरणार असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.दरम्यान जंगल परिसरातील नागरिकांवर होत असलेले वाघाचे हल्ले थांबविण्यासाठी वन विभागाकडुन ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात,तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना शासकीय स्तरावरुन देय आर्थिक मदत तत्काळ मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार गजबे यांनी दिली.यावेळी प्रधान कुटुंबियांसह गावातील संजय वाघमारे,नरेश दोनाडकर, शिवराम मिसार,यादव बघमारे,धनंजय बोरकर,महेश प्रधान,महेश पिंपळकर आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.