नाल्यात पडून इसमाचा मृत्यू

कोरची – प्रतीनिधी, न्यूज जागर 

कोरची मुख्यालयापासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिटेसुर येथील धरमु पुडो (वय 65) हे 9 सप्टेंबरला संध्याकाळी कोटगुल वरून ढोलडोंगरी कडे सायकलने जात असताना कोटगुल नजीक असलेल्या शिवनाथ नाल्याच्या पुलावर अचानक सायकलची चेन पडल्यामुळे धरमु पुडो यांचा तोल गेला व त्यांचा शिवनाथ नाल्यात पडून मृत्यू झाला. नाल्यांमध्ये पाणी नव्हते नाला कोरडा असल्यामुळे त्यांना मार लागून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

पुडो यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आले. याप्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक सुरज पवार हे कोरची येथील पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.