स्वयंम कैलास फाफट नीट परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यात प्रथम

श्री. विलास ढोरे , प्रतिनिधी , न्यूज जागर 

आरमोरी:- वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. ‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात, नुकताच लागलेल्या नीट परीक्षेचा निकाला मध्ये आरमोरी येथील राहिवासी स्वयंम कैलास फाफट याने या परीक्षेत 90 टक्के गुण प्राप्त करून गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे, विशेष म्हणजे त्यांनी कोणतेही खाजगी शिकवणी क्लास न लावता त्यांनी ऑनलाइन ईनेरनेट च्या माध्यमातून व स्वतःकडील नोट्स चा वरील दररोज 18 तास अभ्यास करून त्यांनी यश प्राप्त केला आहे, त्यांच्या या यशा बद्दल आजोबा, वडील, नातेवाईक, शिक्षक आदी ना त्यांनी आभार मानले, त्याच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.