अर्हेरनवरगाव -ब्रम्हपुरी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

सहा महिन्या आतच कंत्राटदाराचे पितळ उघडे
रास्ता दुरुस्तीची मागणी

ब्रम्हपुरी:-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यतील अर्हेरनवरगाव ते ब्रम्हपुरी रस्ता डांबरीकरणाचे काम मागील वर्षी पूर्णत्वास आले परंतु पूर्ण झालेल्या रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले.बांधकामात अतिशय निकृष्ट दर्जाचे व कमी प्रमाणात साहित्य वापरल्याने रस्त्याला सहा महिन्या आतच मोठमोठे खड्डे पडल्याने संबधित विभागाने याकडे तातळीने लक्ष देण्याची गरज आहे.

अर्हेरनवरगाव हे ब्रम्हपुरी तालुक्यातील मुख्य गावांनमधून एक आहे येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला,दूध उत्पादन घेतले जाते त्यामुळे बाजारपेठेसाठी ब्रम्हपुरीचा अवलंब केला जात असून मोठ्या संख्येने विध्यार्थी शिक्षणाकरिता ब्रह्मपुरील ये-जा करत असतात.अर्हेरनवरगाव,पिंपळगाव,भालेश्वर या गावांना तालुक्याला जोडणारा हा मुख्य मार्ग असून सदर मार्गावर ये-जा करणाऱ्यांची बरीच वर्दळ असते त्यामुळे मागील तीन चार वर्षांपासून ब्रम्हपुरी ते अर्हेर नवरगाव मार्गाची दयनीय अवस्था होऊन कित्तेक किरकोळ व मोठे अपघातही झाले असल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे व प्रशासनाकडे रास्ता नविनिकरणाची मागणी रेटून धरली होती त्यामुळे मागील वर्षी या मागणीला हिरवा झेंडा मिळाला व कामाला सुरुवात झाली. सदर बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदारी पद्धतीने होत असून सदर बांधकामात अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे निदर्शनात येत आहे,झालेल्या बांधकामात कंत्राटदाराने जुना रस्ता उखडून तिथेच टाकून त्यावर कमी प्रमाणात गिट्टी चा वापर करून रास्ता तयार केला.सदर रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने रस्त्याची उंची वाढवणे गरजेचे असतांना सुद्धा तसे न करता वयक्तिक बजेट कमीत कमी करण्यासाठी सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.

ब्रम्हपुरी-अर्हेरनवरगाव रास्ता हा दोन विधानसभा क्षेत्रांना जोडणारा असून त्याचा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील काही भाग हा सिमेंट काँक्रीट ने बनविला असून त्या उंचीप्रमाणे हे डांबरीकरणाचे काम करायला हवे होते परंतु कंत्राटदाराने कसल्याही प्रकारची उंची न वाढवता जुन्याच रस्त्याचे खोदकाम करून त्याची लेव्हल केली व वरून थोड्याशा गिट्टीचा थर टाकून डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आणले त्याला सहा महिन्यांचा कालावधी सुद्धा झालेला होत मात्र पुन्हा सहा महिन्या आधीच रस्त्यावरील डांबरीकरण उखडून जागोजागी खड्डे पडलेले असून रस्त्याचे तीनतेरा वाजलेले दिसून येत आहे सदर रस्त्याच्या फुटलेल्या अवस्थेमूळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण होत असून संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाही करून सदर रास्ता सिमेंट काँक्रीट चा बनविण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.

रास्ता बांधकाम करत असताना मधेमधे काही कलवट बांधण्यात आले असून हे बांधकामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत असून कलवट बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या खड्ड्या मध्ये बोल्डर न टाकता माती टाकून त्यावर मुरुम चा थर टाकून मार्ग वाहतुकीस मोकळा करण्यात आला त्यामुळे पावसाच्या पाण्याने तिथे मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे