अरुण बारसागडे न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी
नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेली गट ग्रामपंचायत आलेवाही येथे सौ योगिता देवानद सुरपाम सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आलेवाही वन हक्क समीती गठीत करण्यात आली.
यावेळी ग्रामसभेत श्री सुभाष दसरथ कोरचे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली., शिल्पा सुनील रामटेके सचिव ,
पंकजकुमार हनुमंत नंदेश्वर कोष्षाअध्यक्ष, व इतर सदस्य अशी या समीतीत एकुन ९ लोकांची नीवड करण्यात आली.
तथा जिवनापुर वनहव्क समितीची सुद्धा निवड करण्यात आली. यावेळी घनश्याम महादेव कोवे अध्यक्ष , सौ चंद्रप्रभा सभाजी बोरकर सचिव, रामदिन श्रावण नान्हे कोष्षाअध्यक्ष , व या समिती मध्ये पुरुष, महिला अशा ९ जनाची नीवड करण्यात आली.
सभेला उपस्थित एस.बि. पेन्दाम वनरक्षक आलेवाहि, पंकजकुमार नंदेश्वर ग्रामपंचायत सदस्य जिवनापुर टोला आलेवाही येथिल नागरिक उपस्थित होते.
सभेचे कामकाज वानखेडे ग्रामसेवक ग्रामपंचायत आलेवाही यांनी पाहीले. सभा शांत पध्दतीने पार पडली.