अरुण बारसागडे न्यूज जागर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
व्हिएतनाम येथील जगविख्यात भीक्खुनी सहित तीस विदेशी उपासक भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी भद्रावती येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी ला भेट दिली त्यांचे भद्रावतीत बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून ते बुद्ध लेणी पर्यंत भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले.
वर्षावास आयोजन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सिनेअभिनेता गगन मलिक, भीक्खु थीच बीन्ह ताम, भीक्खुनी थीच नो निर्गीयम ताम , या सह व्हिएतनाम देशातील उपासक उपस्थित होते सर्व प्रथम व्हिहारात यांनी आपल्या भाषेत प्रार्थना केली त्यानंतर सभागृहात त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष अनिल धानोरकर, विनय बोधी डोंगरे, सुरज गावंडे ,महेंद्र गावंडे, जयदेव खाडे, प्रियवंद वाघमारे, बी.डी. देशपांडे , एन डी मेश्राम उपस्थित होते सिनेअभिनेता गगन मलिक यांनी ऐतिहासिक भद्रावती शहराची तसेच बुद्धविहाराचे प्रशंसा केली या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्षावास आयोजन समितीचे अध्यक्ष लीनता जुनगरे, छाया कांबळे, शीला खाडे, शालिनी गोडघाटे, यांनी सहकार्य केले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.