शंकरपूर हेटी येथील बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलवून द्या

 

प्रतिनिधी , न्यूज जागर 

दिनांक १६ सप्टेंबर २०२२ गडचिरोली

मागील १५ दिवसांपासुन शंकरपूर हेटी येथील एम. एस. सी. ई. बी. चे विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पडलेले असल्याने शेतीला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला असून येथे नवीन ट्रांसफार्मर लवकरात लवकर बसवण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन शंकरपूर हेटी येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले. याबाबत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लवकरात लवकर येथे नवीन ट्रान्सफॉर्म बसवण्याची व्यवस्था करावी अशी सूचना एम एस ई बी ला केली आहे.

नवीन ट्रान्सफॉर्मर ५ दिवसात न बसवल्यास एम एस ई बी च्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी या माध्यमातून दिला आहे

मौजा शंकरपूर हेटी येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर मागिल १५ दिवसांपासुन बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत एमएससीबी ला वारंवार विचारणा करूनही अजून पर्यंत त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दिलेले नाही. यामुळे शेतीला करावयाचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे याबाबतचे निवेदन शंकरपूर हेटी येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले व लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी एम एस ई बी ला सूचना करावी अशी विनंती केली.

मात्र पुढील ५ दिवसात विद्युत ट्रांसफार्मर बसवून न दिल्यास एम एस ई बी च्या कार्यालयासमोर आपण आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी आमदार महोदयांच्या माध्यमातून एम एस ई बी ला दिला आहे.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी एम एस ई बी संपर्क करून लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवून विद्युत पुरवठा पूर्ववत करून द्यावा अशी सूचना केली.