सामुहिक वनहक्क व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळा

श्री.अरुण बारसागडे जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:-जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हा परिषद चंद्रपूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमुर, उपजिल्हाधिकारी कार्यालय ब्रम्हपूरी आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वन हक्क व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबईने संशोधनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १०० सामूहिक वन हक्क प्राप्त गावांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये २२ गावे ब्रम्हपूरी आणि ३ गावे नागभीड तालुक्यातील निवडले आहेत.

या कार्यक्रमात श्री. संदीप भस्के, उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी, श्री. केशव बावनकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमुर, श्री. संजय पूरी, गट विकास अधिकारी ब्रम्हपूरी, श्री. महेश गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी, उत्तर ब्रम्हपूरी, श्री. राम शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी, दक्षिण ब्रम्हपूरी यांनी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत पी. पी. टि. चे सादरीकरण श्री. सागर साबळे, ब्रम्हपूरी-नागभीड तालुका वन हक्क व्यवस्थापक आणि श्री. श्रेयस पन्नासे, संशोधन अधिकारी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांनी केले तसेच कार्यक्रमात मोलाचे सहकार्य सौ. स्नेहा ददगाळ, जिल्हा वन हक्क व्यवस्थापक, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सौ. वैष्णवी चौधरकर, चंद्रपूर-मूल-सावली तालुका वन हक्क व्यवस्थापक, श्री. जगदीश डोळसकर आणि श्री. अमोल कुकडे संशोधन अधिकारी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांनी केले.

या कार्यक्रमात चांदगाव, बेलदाटी, दुधवाही, वायगाव, काटलीचक, नवेगाव खुर्द, तुलानमेंढा, तुलानमाल, धामनगाव, तळोधी खुर्द, चिचगाव, कोसंबी खड., आक्सापूर, सायगाटा, लाखापूर, देऊळगाव, रानबोथली, गायडोंगरी, जवराबोडी मेंढा, आकापूर (रुपाळा), चोरटी, खेडमक्ता, वसाळा मक्ता, देवपायली आणि सोनुली या गावातील सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.