ब्रम्हपुरी येथे अल्पवयीन मुलीकडून देहविक्री-पतिपत्नीस अटक

श्री.अरुण बारसागडे जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

14-year-old minor girl was being trafficked in Bramhapuri, chandrapur distt.

नागपूर येथील सामाजिक संस्थेच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना चंद्रपूर जिल्ह्यात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून देहविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली .
घटनेची गंभीरता बघता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना याबाबत माहिती दिली, यावर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले.
बाळासाहेब खाडे यांनी सपोनि संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून अगोदर ब्रह्मपुरी येथील मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलोनी बंगला क्रमांक 14 येथे 1 डमी ग्राहक पाठवीत प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर सापळा रचत धाड मारली व पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली
सदर अल्पवयीन मुलगी कलकत्ता येथील असून एका महिलेने तिला नागपूर येथील दलालाला विकले व दलालाने त्या अल्पवयीन मुलीकडून विविध ठिकाणी देहविक्री करायला लावली.
या प्रकरणात आरोपी पतिपत्नी 40 वर्षीय मंजित रामचंद्र लोणारे व 32 वर्षीय चंदा मंजित लोणारे यांना ताब्यात घेत अटक केली असून पोलिसांनी पोस्को सहित विविध कलमानंतर्गत विविध गुन्हे दाखल केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात ठाणेदार मनोज गजभे, सपोनि संदीप कापडे, सपोनि मंगेश भोयर, आदींनी यशस्वी केली.