श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
रत्नापूर दि 10 सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथे गावात वर्ग १ ते 8 पर्यंत शिक्षण घेता येणारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कार्यरत आहे सदर शाळेच्या काम काजावर देखरेख ठेवणारी शाळा व्यवस्थापन समिती होती त्या समितीची मुदत संपली होती आणि म्हणून शाळेच्या वतीने सर्व शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी यांचे पालकाची पालक सभा नुकतीच शाळेच्या सभागृहात पार पडली
वरील सभेचे अध्यक्षस्थान सरपंच कविता सावसाकडे हयानी होत्या प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील नरेंद्र गहाणे माजी अध्यक्ष दिनेश्वर लोधे अनिल ढोणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेखा पंधरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांचे हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरवात केली या वेळी पालकामधुन शासनाचे जी आर नुसार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हे पूर्ण आठही वर्गातुन विदयार्थ्यांचे पटसंख्या नुसार जातीनिहाय आरक्षण देवून बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली, यात संदीप रेप कवार दिनेश्वर लोधे नरेंद्र डेकाटे रामकृष्ण गरमळे नम्रता वल्के प्रतीभा सेंदरे चंद्रशेखर नन्नावरे प्राजक्ता झोडे संगीता पर्वते संगीता दडमल नामदेव लोखंडे चेतना शेंडे यांची निवड करण्यात आली आहे या सदस्य मधुन दिनेश्वर लोधे यांची अध्यक्ष पदी तर संदीप रेपकवार यांची उपाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली पालक सभा अगदी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी शालेय उपक्रम व शासकीय मुलांना मिळणाच्या योजना या बद्दलही माहिती देण्यात आली उपस्थीत पाहुण्यानी सुद्धा मार्गदर्शन केले.
वरील पालक सभेचे संचालन सहा शिक्षक मिथुन रामटेके यांनी केले तर आभार सहा शिक्षक सोमेश्वर आत्राम यांनी मानलेत पालक सभेला मोठ्या प्रमाणात पीता पालक व माता पालक उपस्थीत होते पालक सभा यशस्वीतेसाठी मुख्याध्याप रेखा पंधरे शिक्षक दिनकर गायकवाड शितल सारलावार चंदा गुडवार सोमेश्वर आत्राम मिथुन रामटेके मोतीराम सोनकुसरे वैशाली कोवले सविता राऊत यांचे सह सचिन ढोणे यांनी सहकार्य केले