परंपरेला फाटा देत ” रक्तदान ” शिबिर घेऊन डॉक्टर भीवाजी पा. बोरकर यांचे  पुण्यस्मरण 

 . श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर 

कोरोना काळात निधन झालेले डॉक्टर भिवाजी पाटील बोरकर  यांचे द्वितीय पुण्यस्मरण परंपरेला फाटा देत रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली .

नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील  निवृत्त पोलीस पाटील व सामाजिक कार्यकरते   डॉक्टर भिवाजी पाटील बोरकर  यांचे कोरोणा मध्ये नागपूर येथे   निधन झाले   त्यांचे अंत्यसंकारही नागपुरात उरकवण्यात आले यात कुटुंबाला  औपचारिक्ता म्हणून सर्व सोपस्कार पार पाडावे  लागले  परंतु त्यांचे दुसरे पुण्यस्मरनाचे औचित्य साधून   घरीच “रक्तदान” शिबीराचे आयोजन करण्यात आले . यात  40. युवकांनी  स्वयंमप्रेरणेने रक्तदान करून आदरांजली वाहत  त्यांचे कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व पार पाडले . या उपक्रमाने  परिसरात आदर्श निर्माण केला आहे.

रुग्णालयातील रक्ताची कमतरता लक्षात घेता  स्व. डॉ. भिवाजी पा. बोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने श्री बोरकर & परिवार परिवार व रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ला सावरगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

यावेळी सामान्य रुग्णालय  जील्हा भंडारा येथून अधिष्ठाता विनय डांगे, राहुल गिरी, प्रज्वल मेहर, अमित हेलमारे, आकाश बुरस्कर  यांनी काम पाहिले. या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक करित शुभेच्छा दिल्या गेल्या.  यावेळी रक्तदात्यांना चहा, केळी, बिस्किटे यांची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्पमित्र घृष्णेश्वर बोरकर, विकास बोरकर, रुकाजी पा. बोरकर, मंगेश पर्वते , विश्वेश्वर बोरकर ,श्रीराम बोरकर, सचिन निकुरे, राजू निकुरे यांनी परिश्रम घेतले.