जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानात केली काळी दिवाळी साजरी

श्री. अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

 

शंभर टक्के पगारासाठी राज्यभरातील शेकडो शिक्षक पंधरा दिवसापासून आझाद मैदानात बस्तान मांडून

मागील पंधरा ते वीस वर्षापासून विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या राज्यातील साठ हजाराच्या वर संख्या असलेल्या शिक्षकांना शासनाने विविध अध्यादेश काढीत शिक्षकांना आणि शाळांना लालीपाप दाखवण्याचे चित्र आलेल्या प्रत्येक शासनाने केल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून हजारो शिक्षक मुंबई येथील आझाद मैदानावर ती धरणे आंदोलनाला बसलेले असून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे शंभर टक्के पगार सेवा संरक्षण निवृत्ती वेतन वैद्यकीय ध्येयपूर्ती व समान काम समान वेतन या विविध मागण्यांना घेऊन शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या बॅनरखाली आंदोलनाला बसलेले आहेत दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा व फार मोठा असा हा सण असून प्रत्येक जण तो सण आपल्या परिवारासोबत साजरा करण्याच्या प्रयत्नांमध्ये असतो मात्र राज्यातील हजारो शिक्षकांच्या हातात पैसाच नसल्यामुळे आपल्या न्याय्य मागण्या करिता त्यांनी आपली दिवाळी आझाद मैदानावर काळी दिवाळी म्हणून चटणी-भाकर खास साजरी केल्याचे चित्र दिसून आले आहे एवढेच नव्हे तर अनेक शिक्षक शिक्षिका आपल्या परिवारास समवेत लहान मुलान बाळा समवेत आझाद मैदानावर ती बस्तान मांडून असल्याकारणाने असे विदारक चित्र पाहून तरी शिक्षण विभागाला जाग येईल असे वाटले होते मात्र यावर ती शासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने शेवटी शिक्षकांची भाउबीज सुद्धा आझाद मैदानावर साजरी होत असल्याचे दिसून येत असून जोपर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आजाद मैदान सोडणार नाही असा ठाम निर्धार जिल्हाभरातील शिक्षकांनी केलेला असून जे शिक्षक बांधव आपल्या परिवारास समवेत घरी बसलेले आहे अशा सर्वांनी ताबडतोब मुंबई गाठावी व आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे चे आव्हान चंद्रपूर जिल्हा शिक्षक समन्वय संघाने केलेले असून मैदानावर ती आपली उपस्थिती हीच यशाची होऊ शकते अन्यथा इतर राज्यातील शिक्षका प्रमाणे आपल्याला सुद्धा ठेकेदारी पद्धतीने पगार घेतल्याशिवाय शासन ठेवणार नाही त्यामुळे आपल्या भविष्याची जाण ठेवत जिल्हाभरातील सर्व विनाअनुदानित अंशत अनुदानित त्रुटी पात्र अघोषित शिक्षकांनी मुंबई गाठण्याचे आव्हान केले आहे