श्री. अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
किसान पाणीवाटप संस्थेवर संपूर्ण पिकांचा दावा ठोकणार
सावली.
तालुक्यातील गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत आसोला मेंढा तलावाचे पाणी निमगाव बंद पाईपलाईन द्वारे सोडण्यात येत असून अनेक ठिकाणी बॉल वाल बसविण्यात आले आहे, त्या पाईपलाईन चा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत असून शेतीला पाणी न मिळाल्यास संपूर्ण पीक नुकसानीचा दावा किसान पाणी वाटप संस्थेवर ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पुनम झाडे यांनी दिला आहे.
विरखल शिवारातील सर्व्हे क्र.302 करिता कसल्याही प्रकारचे बॉल वॉल बसाविण्यात आले नव्हते,बॉल वालचुकीच्या ठिकाणी बसविले होते,त्या पाईप लाईनसंदर्भात गोसीखुर्द विभागाचे अभियंता व कंपनी सोबत चर्चा करण्यात आली त्यावेळेस शेतकऱ्यांच्या समाधानासाठी वरच्या बाजूला बॉल वाल बसवून दिले परंतु त्या वॉल ला अजून पर्यंत पाणी आले नाही, त्यामुळे सदर शेतकऱ्याचे पीक फुल गर्भात असताना कोमजले आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे, निमगाव पाईपलाईनची तपासणी न करता किसान पाणी वाटप संस्थेने हस्तांतरण करून घेतले, हस्तांतरण करून घेण्यामागे संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा उद्देश काय? जेव्हा संपूर्ण बॉल वॉल ला पाणी निघत नसताना ते काम पुर्ण झाल्याशिवाय हस्तांतरण करायला नको होते परंतु पदाधिकारी स्व मर्जीने हस्तांतरण करून घेतले, आज अनेक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे, याबाबत अनेक वेळा संस्थेच्या अध्यक्षाकडे तोंडी सुचना करण्यात आले पाणी आज करून देतो उद्या करून देतो या सबबखाली वेळ मारून नेली, आज हातात येणारे पीक जर जात असतील तर शेतकऱ्यांनी काय खाऊन जगावे असं प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे,
या परिसरातील अनेक बॉल वाल ला पाणी येत नसून अनेक शेती पाण्या अभावी मरताना दिसून येत आहे, याकडे पाणी वाटप संस्थेचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे, धानपीक आता निसव्यावर असून त्याला पाण्याची नितांत गरज आहे, परंतु पाणी वाटप संस्थेच्या दुर्लक्षामुळे शेत पीक करपत आहे, यावर्षी धान पिकाला पाणी न मिळाल्यास आणि धान पिकांचे नुकसान झाल्यास किसान पाणी वाटप संस्थेवर नुकसान भरपाई चा दावा ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पुनम झाडे व येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी संस्थेला दिला आहे.