श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
मालेवाडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम
राष्ट्रसंताचा मंच असून या मंचावरून राजकीय विषय मांडणार नसून राष्ट्रसंताच्या आशीर्वादाने च माझी गुरुदेव सेवा मंडळ मोझरी च्या संचालक पदी निवड झाली असून या पुढे प्रत्येक घरात राष्ट्रसंताच्या विचार पोहचविणे चे कार्य करायचे आहे. स्वतःच्या जीवनात स्वतः शिल्पकार व्हायचे असल्यास राष्ट्रसंताचे विचार अंगीकार करणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया म्हणाले की मालेवाडा गाव व्यसनमुक्ती होण्यासाठी गावकऱ्यांची जबाबदारी असणे आवश्यक आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत असल्याने मला दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगत परिवर्तन करण्याची ग्वाही दिली.
मालेवाडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडिया बोलत होते.
यावेळी गवते महाराज,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, प्रा अशोक चरडे, मांगलगाव चे सरपंच प्रफुल कोलते, रमेशजी कंचर्लावार, सुखदेव ढोणे तमुस अध्यक्ष घोडमारे प्रा धनराज मुरकुटे , विठ्ठलराव सावरकर, संपादक केशवराव वरखेडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरविंद दडमल यांनी केले यावेळी हजारो गुरुदेव भक्त गण उपस्थित होते.