श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
कोठारी
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय संस्थापक व अध्यक्ष एड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व वंचित आघाडी चे चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेश बोरकर व वंचित बहुजन आघाडी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांच्या सुचने नुसार रेखा ठाकूर प्रदेश अध्यक्ष यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी च्या बल्लारपूर तालुकाध्यक्ष पदावर उमेश वाढई(दहेली)यांची निवड करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे विशाल प्रभुदास डुंबरे(बल्लारपूर) यांची तालुका उपाध्यक्ष, तर एड. प्रविण जानगे(बल्लारपूर) यांची तालुका महासचिव,अतुल पावडे(दहेली) सचिव पदावर तर सदस्य म्हणून संदीप निरंजने(दहेली),अंकुश जीवने(दहेली),सचिन रामटेके(कोठारी)निवड करण्यात आली आहे.
उमेश वाढई यांनी मागील नवीन दहेली ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित च्या चार जागा लढवून दोन सदस्य निवडून आणून बल्लारपूर तालुक्यात प्रथमता वंचित बहुजन आघाडीचे पाय रोवले.सध्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्राम पंचायत मध्ये वंचित बहुजन आघाडीची एकहाती सत्ता आहे.मागील तीन वर्षापासून उमेश वाढई वंचित मध्ये कार्यरत असून त्यांच्या कामाची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.आगामी बल्लारपूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायती,जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच बल्लारपूर नगर परिषद च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून सक्षम उमेदवार लढवून सत्ता काबीज करण्यासाठी संघर्ष करणार आहे.संपूर्ण तालुक्यात पक्षाची बांधणी करण्यात येणार असल्याचे मनसुबे त्यांनी पुण्यनगरीशी बोलतांना व्यक्त केले.यावेळी त्यांचे मार्गदर्शक , सिद्धार्थ शंभरकर , ओम रायपुरे, धीरज भाऊ बांबोडे व सहकारी मित्र, नवनियुक्त वंचित चे सदस्य संदीपभाऊ निरंजने, अंकुश जिवणे, अतुल पावडे,राहुल रामटेके , सचिन रामटेके उपस्थित होते.