स्वखर्चाने बसविले सिमेंट बेंच

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

सिंदेवाही प्रतिनिधी सिंदेवाही ,लोणवाही नगर पंचायत च्या प्रभाग क्र 13 च्या नगरसेविका सौ वैशालिताई पुपरेड्डीवार यांनी स्वताच्या प्रभागात विविध मोक्याच्या ठिकाणी सिमेंट बेंच स्वखर्चाने बसविले आहेत
नेहमीच समाज कार्याची आवड असलेल्या वैशाली ताई सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिल्या आहेत त्या स्वता एक व्यावसायिक असूनही कोणतेही काम असो त्या नेहमीच हिरीरीने सहभाग नोंदवतात त्यामुडे त्या प्रभागात लोकप्रिय आहेत या कामात त्यांचे पती श्री संजय पुपरेड्डीवार यांची देखील मोलाची साथ लाभत असते सकाळी सायंकाळी दुपारी त्या प्रभागातील नागरिकांना गप्पागोष्टी करिता खाली बसावे लागत होते ही अडचण लक्षात घेत वैशाली ताईंनी या ठिकाणी सिमेंट बेंच बसविले त्यांच्या या कामाचे येथील नागरिकांनी खूप प्रसंशा करून आभार मानले