श्री. अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
घरकुल देतांना प्राध्यान्यक्रम न दिल्याने अनेक कुटुंब लाभापासून वंचित असल्याची तक्रार.
वरोरा तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेले सालोरी गावात विमुक्त भटक्या जमाती समाजातील गरजू कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुफ्त आवास योजना राबविताना तेथील सरपंच व सत्ताधारी भेदाभेद केला व गरीब कुटुंबातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ देण्याऐवजी स्वतःच्या जवळच्या लोकांना लाभ दिला असल्याची तक्रार गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे दिली होती व ज्यांना लाभांपासून वंचित ठेवण्यात आले होते त्यांना घरकुल देण्याची मागणी केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत जवळपास ६२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली पण त्यांना घरे मिळणार कधी ? हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याने सामाजिक नेत्या तथा छावा छात्रवीर संघटना च्या राज्य अध्यक्षा राजूरकर व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात सालोरी गावातील लाभार्थी असणाऱ्या महिला व पुरुषांनी वरोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप घोडशलवार यांना त्यांच्या कार्यालयात घेराव केला व आम्हचे लवकरात लवकर घरकुल मंजूर करण्याची मागणी केली.
सालोरी गावाची लोकसंख्या बघता व तेथील विमुक्त भटक्या जमाती मधील कुटुंबाची संख्या बघता जवळपास ५० घरे मंजूर होणे अपेक्षित होते मात्र जवळच्या भटाळा गावांत ४८ घरकुल मंजूर झाले पण सालोरी गावांत केवळ ९ घरकुल मंजूर करण्यात आले त्यातही ज्यांना घरे मंजूर करण्यात आले त्यापैकी काहींची चांगली घरे आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या सत्ताधारी यांनी भेदभाव केला व गावातील गरजू लोकांना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून वंचित ठेवल्याने आज सालोरी गावातील लाभार्थी महिला पुरुषांनी पंचायत समिती गाठली व त्वरीत घरकुल मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी संवर्ग विकास अधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन नव्याने घरकुल मंजुरी संदर्भात यादी शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले व उद्या होणाऱ्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत हा विषय पंचायत समिती अधिकारी यांच्या माध्यमातून ठेवला जाईल असे पण आश्वासन दिले.
या प्रसंगी छावा छात्रवीर सेनेच्या राज्य उपाध्यक्षा विशाखा राजूरकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विभाग अध्यक्ष संदीप मोरे. एकनाथ पडाल. राजू रंदई,वाल्मिक मोरे. सुनील मोरे. जागो मोरे. दादाजी मोरे. नामदेव बावणे. विठ्ठल तुमसरे. संभा तुमसरे मधुकर मोरे. सुंदरा मोरे शारदा मोरे जोशिला मोरे. जोत्सना मोरे. कल्पना तुमसरे. लक्ष्मी मोरे रमेश निखाते. विष्णू तुमसरे व असंख्य महिला पुरुष उपस्थित होते..