श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
पक्षीय मोर्चेबांधणीला वेग
निस्वार्थी उमेदवार लक्षवेधी
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी,बामणी(दु.),काटवली,इटोली व कवडजई या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार असून त्यासाठी १८ डिसें ला मतदान होणार आहे.निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून सुजाण,सुशिक्षित,निस्वार्थी,गाव विकासाची तळमळ असणाऱ्या होतकरू,कर्तृत्ववान उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली.या निवडणुकीतही सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे.कोठारी ग्राम पंचायतीत तेरा सदस्य व सरपंच,बामणी(दु.)ग्राम पंचायतीत तेरा सदस्य व सरपंच,काटवली मधून सात सदस्य व सरपंच,इटोलीतून नऊ सदस्य व सरपंच तसेच कवडजई ग्राप मध्ये नऊ सदस्य व सरपंचाची निवड करायची आहे.कोठारी ग्राम पंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिला सरपंच आरक्षित करण्यात आली आहे.बामणी मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण,काटवली मध्ये सर्वसाधारण,इटोलीत सर्वसाधारण तर कवडजई ग्राप मध्ये सर्वसाधारण सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.मागील निवडणुकीत कोठारी ग्रामपंचायत व बामणी काँग्रेस प्रणित आघाडीचे वर्चस्व होते तर इटोली,काटवली व कवडजई ग्राम वर भाजप प्रणित पॅनेलची सत्ता होती.तालुक्यातील कोठारी व बामणी ग्राम पंचायतीवर काँगेस वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे तर काटवली,इटोली व कवडजई ग्राप वर काँग्रेस भाजपला धक्का देण्यासाठी वयुहरचना करणार आहे.मात्र पाचही ग्रामपंचायतीवर भाजप पॅनेलची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे.
बल्लारपूर तालुक्यातील सतरा ग्रामपंचायती असून बारा ग्रामपंचायतीत काँग्रेस,भाजप व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे.आता पाचही ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, भाजप,वंचित,शिवसेना,राष्ट्रवादी आदी पक्ष्याचे नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडनुक लढविणार्यासाठी दोन दिवसांची पण पाच वर्षे सर्व नागरिकांना भोगावे लागते.पैसे कमविणे हे डोक्यात ठेऊन निवडणूक लढवीत असाल तर अतिशय वाईट आहे.ज्यांच्याकडे वेळ, कुवत,ज्ञान,शिक्षण आहे गावाचे काहीतरी चांगले करायची संकल्पना आहे.अशानीच या क्षेत्रात येऊन गावाचा विकास व गावकऱ्यांच्या समस्या निस्तारण्यासाठी प्रयत्न करावे.हौशीनी ग्रामपंचायतीत येऊन गावाच्या विकासाला आडकाठी निर्माण करून गावाचा नाश करू नये.राजकारण नुसतं निवडणुकीपूरते मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे.दुर्दैवाने गावकरी त्याकडे व्यापक अर्थाने पाहत नाही.मग वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करावा लागतो.गावाचा विकास करण्यासाठी निस्वार्थी उमेदवारांची गावकर्यांना नितांत गरज असल्याने निष्कांचंन उमेदवारांची शोध मोहीम सर्व पक्षाकडून सुरू आहे.येणारी निवडणूक रंगतदार होणार यात दुमत नाही.सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करीत कामाला लागल्याचे चित्र आहे.