श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सास्ती
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र सुमठाणाचे कक्ष क्रमांक 154 मधील नाल्यात रात्री दोनचे सुमारास,ट्रॅक्टर मध्ये रेती भरून तस्करी करीत असताना ट्रॅक्टर सह दोघांना ताब्यात घेऊन वनगुन्हा दाखल करण्यात आला
वनक्षेत्रात रात्रीच्या वेळी नियमित गस्त करीत असताना जंगलातील नाल्यातून रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळताच गस्तीमधील क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक मीरा राठोड,सुनील गजलवार , रोपवण चौकीदार नरेश निखाडे,मयूर आत्राम,फकरु लेनगुरे,गंगाधर भेंडारे, चालक मंगल पांचभाई,यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता विना परवानगीने ट्रॅक्टर मध्ये रेती भरीत असल्याचे आढळून आले त्यावरून ,आरोपी अमर वसंता वाघाडे आणि अरविंद वाघाडे यांचे सह ट्रॅक्टर जप्त करून मध्यवर्ती काष्ठ आगारात जमा करण्यात आले आणि वनगुन्हा दाखल करण्यात आला यावेळी इतर काही मजूर पळून जाण्यात यशस्वी झालेत
ही कारवाई उपवनसरक्षक श्वेता बोड्डू ,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड ,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक सुनील गजलवार,मीरा राठोड यांनी केली असून आरोपीचा शोध सुरू आहे