ग्राम पंचायत रत्नापूर भवन बाधकाम भुमिपुजन संपन्न

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

रत्नापूर दि 14 सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे पंधरा सदस्यीय ग्रामपंचायत गाव विकासासाठी कार्यरत आहे सदर ग्रामपंचायत ची इमारत ही जुनी झाली होती त्यामुळे त्या इमारती ला निरले खीत करण्यात आले आणी शासनाकडुन नविन ग्राम पंचायत भवन बांधण्यासाठी निधी मजुर केला गेला जवळपास ही इमारत पडक्या अवस्थेत असताना पंधरा वर्षा पासुन ग्रामपंचायत सभागृहात कारभार चालु होता ह्या मंजुर झालेल्या ग्राम पंचायत भवन बांधकाम करण्याचा भुमिपूजन सोहळा नुकताच माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही राजेंद्र बोरकर , माजी जी प सदस्य रमाकांत लोधे, सरपंच कविता सावसाकडे, माजी सरपंच सदाशीव मेश्राम, उपसरपंच अशोक गभणे, ग्राम पंचायत सदस्य मंगेश मेश्राम, वामन झोडे, अरुण मडावी, प्रवीण कामडी, माया लोधे, उषा धारणे ,रजनी काऊलकर, सुरेखा पर्वते, हेमलता सोनटक्के, ग्राम विकास अधिकारी श्रीकांत वन्नेवार, तमुस अध्यक्ष बालाजी लेंझे, प्रतीष्ठीत नागरीक सदाशिव मडावी, गिरीश बोरकर व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थीती त पार पडला सदर ग्राम पंचायत भवन बांधकामासाठी नागरी सुवीधा योजना विस लाख व जन सुविधा योजना विस लाख असे एकुण चाळीस लाख रुपये मंजुर झालेले असुन ह या चाळीस लाख रुपयात ग्राम पंचायत भवन बांधण्यात येणार असून प्रशास्त इमारत होणार आहे भुमीपूजन सोहळ्या नंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे ग्रामपंचायतला हे भवन मिळाल्या ने गावकरी जनतेनी समाधान व्यक्त केले आहे