श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
तीन महिन्यानंतर प्रकरण उघडकीस
मुलीच्या तक्रारी वरून आई आणि आईच्या प्रियकराला अटक
ब्रम्हपुरी
प्रेम आंधडे असते,प्रेम करायला वयाचे बंधन नसते असे म्हणतात ते खोटे नाही.ब्रम्हपुरी शहरातील 50 वर्षीय महिलेने आपल्या प्रेमात अडथळा बनणाऱ्या आपल्या 65 वर्षीय पतीची तीन महिन्यापूर्वी हात बांधून, तोंड दाबून हत्या केली व हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याची बनवाबनवी करून प्रकरण झाकले.घटनेच्या तब्बल तीन महिनेनंतर मोठ्या मुलीला आईचा मोबाईल हाताळताना आईचा व आईच्या प्रियकराचे मोबाईल मधले संभाषण अयीकायला मिळाले व त्यातून आईने वडीलाची हत्या केल्याचे उघडकीस आले.मुलीने या बाबत ब्रम्हपुरी पोलिसात दिनाक 12 ला तक्रार दिल्याने पोलिसांनी हत्याच्या आरोपाखाली महिला व तिच्या प्रियकराला आज दिनाक 13 ला अटक करून दोन दिवसाचा पोलिस कोठडी मिळवली आहे.
सविस्तर वृत्तां नुसार मुलगी श्वेता रामटेके वय 25 हीचे तक्रारी नुसार , ते शिवमंदरजवळ , गुरुदेव नगर येथे कुटुंबियासह राहत असून त्यांचे कुटुंबात आई श्रीमती रंजना रामटेके वय 50 वर्ष , लहान बहीण कु . योगेश्री वय 23 वर्ष असे मिळून राहतात . वडील शाम रामटेके यांचे दि .06 / 08 / 2022 रोजी निधन झाले आहे . त्याच रोजी त्यांचे अग्निसंस्कार केलेले आहे . श्वेताचे शिक्षण बीएससी पर्यंत झालेले असून यापूर्वी ती पीव्हिआर मॉल नागपूर येथे काम करीत होती . सध्या तिचे लग्न जुळलेले असून दि . 27/11/2022 रोजी लग्न आहे . त्यामूळे दि . 05/11/22 रोजी ती काम सोडून ब्रम्हपूरी आलेली आहे .आंबेडकर चौक ब्रम्हपूरी येथे त्यांचे जनरल स्टोअर्सचे दुकान असून ते आई चालविते . दुकानाजवळ मुकेश त्रिवेदी वय अदांजे 45-50 वर्षे यांचे भाजीपाला व बांगडयाचे दुकान आहे . ते रेल्वे स्टेशनजवळ राहत असून रामटेके यांचे घरी नेहमी येत असतात . श्वेता चे वडील शाम रामटेके वन विभागात क्लर्क असून सेवानिवृत्त झालेले होते .
दि 06/08/2022 रोजी दोन्ही मुली श्वेता व योगेश्री नागपूरला असतांना सकाळी 07.30 वा दरम्यान आईने फोन करून सांगितले कि त्यांचे वडील श्याम रामटेके यांचे निधन झाल्याचे कळविले . वडिलांना रात्री झोपेमध्ये हार्ट अटक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले . वडिलांचे वय 66 वर्षे असल्याने तसेच तसेच दुःखात असल्याने त्यांचे मरणाची शक्यता गृहीत धरून जास्त विचारपूस केली नाही . पण वडिलांच्या निधनानंतर आठवडाभरात आई च्या वागणूकीत अचानक बदल दिसायला लागला . ती दोन्ही मुलींशी निट वागत नव्हती . तसेच मुकेश त्रिवेदी चे घरी वेळोवेळी यायला लागला . त्यांच्यात अफेयर चालू असण्याचा संशय मुलींना आला तेव्हा तीला समजावून सांगण्याचा प्रयन्त मुलींनी केला पण ती ऐकत नव्हती, मुलींनी मुकेश त्रिवेदी ला ही समजावण्याचा प्रयत्न केला होता , काही दिवसांनी मुलगी श्वेता हि नोकरीनिमीत परत नागपूर ला निघून गेली सोबत बहीण योगेश्रीलाही घेउन गेली होती . आई एकटी राहत असल्याने योगेश्री काही दिवसांत परत आली होती , योगेश्रीला आईच्या मोबाईलमध्ये मुकेश त्रिवेदीसोबत बोलण्याचे रीकॉडर्डींग दिसल्याने तीने आईकडे असलेल्या मोबाईलमधून ते आपल्या मोबाईलमध्ये ट्रांसफर करून घेतले . दि. 11/11/2022 रोजी योगेश्रीकडे असलेला व्हिवो कंपनीचा मोबाईल सहज पाहत असतांना मोठी बहीण श्वेता हिला त्यात दि . 06/08/2022 रोजी रात्री 02.14 वा . 10.57 मीनीटांची रीकॉडर्डींग दिसली . त्यात आई रंजना शाम रामटेके हि मुकेश त्रिवेदीसोबत त्याचे मो . नं . 9371585572 वर बोलल्याचे ऐकले . त्यात रंजना ने मुकेश त्रिवेदी शी बोलतांना सांगितले कि रंजनाने वडील श्याम रामटेके यांना कुठलीतरी औषध दिली व त्यांचे हात बांधून रात्रौ 01.30 वा तोंडावर उशी दाबुन मारून टाकले असे सांगितले . त्यावर मुकेश त्रिवेदी तीला उशी उचलून ठेवायला सांगितले व बिस्तर सरळ करायच्या सूचना दिल्या व सकाळी शेजारील व नातेवाईकांना हार्ट अटॅक आल्याचे सांगायचे असे सल्ले देत असल्याचे ऐकू येत आहे . त्याचा आवाज श्वेता हिने ओळखला.
त्यावरून आई श्रीमती रंजना शाम रामटेके वय 50 वर्ष व मुकेश त्रिवेदी वय अदांजे 45-50 वर्षे रा . रेल्वे स्टेशनजवळ , ब्रम्हपूरी यांच्यात अनैतिक संबंध असल्याने वडील श्याम रामटेके त्यात अडथळा असल्याचे कारणावरून दि .06 / 08 / 2022 रोजी रात्री 01.30 वा आई रंजना शाम रामटेके व मुकेश त्रिवेदी यांनी कट करुन वडील शाम पांडूरंग रामटेके , वय 66 वर्षे यांचे तोंडावर व नाकावर उशीने दाबुन गूदमरून ठार केले तसेच त्यांचा मृत्यु हार्ट अटैकने झाले असल्याचे भासवुन त्यांचे अत्यंविधी केले सदर प्रकार मुलगी श्वेता ला लक्षात येताच आज दोघांविरुध्द तिने कायदेशीर तक्रार केली आहे
मुलीचे तक्रारी वरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.