चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर (आष्टी) मधील एका तरुनी चा विहिरीत पडून मृत्यू

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर  

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर (आष्टी) मधील एका तरुनीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 14 नोव्हेंबरला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक तरुणीचे नाव सुप्रिया सुभाष कुबडे वय १६ वर्ष राहणार ईल्लूर असे आहे. सदर तरुणी सकाळी पाणी आणण्यासाठी अशोक पातर यांच्या घराजवळ असलेली शासकीय विहिरीवर गेली होती, ती पाणी काढत असताना झोक जाऊन विहिरीत पडली, तेव्हा विहिरी जवळ असलेल्या लोकांना आवाज आल्याने त्या ठिकाणी धाव घेऊन त्या तरुणीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करूनही यश आले नाही. शेवटी तिचा मृत्यू देह बाहेर काढावे लागले.

घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास आष्टी चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व कर्मचारी करीत आहे.