सिंदेवाही पोलिसांनी आश्रम शाळेमध्ये केला बालदिन उत्साहामध्ये साजरा

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

14 नोव्हेंबर हा दिवस आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती हा दिवस सगडीकडे बालकदिन म्हणून साजरा केल्या जातो याचे औचित्य साधून पोलीस स्टेशन शिंदेवाही तर्फे शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मरेगाव ता सिंदेवाही येथे, भेट देऊन, बालक दिन साजरा केला.

बालक दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन शिंदेवाही तर्फे पोलीस सारथी मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, त्यामध्ये गुड टच, बॅट टच, लैंगिक अत्याचार, शोषण, तसेच तंबाखू गुटखा असे मादक पदार्थ सेवन न करणे अशा सूचनात्मक मार्गदर्शन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व भेटवस्तू देऊन बालक दिन साजरा करण्यात आला. पोलीस काका व पोलीस दीदी यांचे सोबत बालदिन साजरा झाल्यामुळे सर्व बालकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद रंगारी अधीक्षक शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मरेगाव, तसेच इतर शिक्षक वृंद हजर होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सपोनी योगेश घारे, ठाणेदार पोलीस स्टेशन सिंदेवाही, पो.अ. रणधीर मदारे, पो.अ. मंगेश मातेरे, महिला पो. अ. रूपा राऊत हे उपस्थित होते.