श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
घुग्घूस
लॉयड्स मेटल्स कामगार सहकारी पत. संस्था रजि. न.354 या संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी संपल्यामुळे मा. सह्याय्य्क निबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी या संस्थेची पंचावार्षिक निवडणूक घेण्या करण्याकरीता प्राधिकृत अधिकारी म्हणून एम. बी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या पत संस्थेत एकूण 111 सभासद क्रियाशील असून व्यवस्थापक कमेटी संचालक मंडळ 11 सदस्यांचे आहे.111 सभासदापैकी 10 सभासदांनी उमेदवारी फॉर्म भरून निवडणुकीत भाग घेतला यामुळे प्राधिकृत अधिकारी यांनी निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले.व आज दिनांक 16 नोव्हेंबरला नवनिर्वाचित सदस्यांची सभा बोलावून अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, व खजिनदार या पदाधिकाऱ्याची निवडून आलेल्या सदस्यामधून निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून समीर शील, उपाध्यक्ष परशुराम उगे, मानद सचिव ईश्वर लेंडे, व खजिनदार मोहम्मद बाबुजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून नितीन सिंघाभट्टी,विनोद थेरे,सुशील धोंगडे,हिवराज बागडे,धिरज पाटील, श्रीमती निशा जोगी यांची अविरोध निवड करण्यात आली निवडून आलेले पदाधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्राधिकृत अधिकारी म्हणून मनिष जाधव यांनी काम पाहिले.