राज्यात प्रथम चंद्रपुरात सिएमपी प्रणालीद्वारे वेतन

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात होणार जमा; वेतन विभागाला मिळाली कार्याची पावती

शासनाने खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांचे नियमित मासिक वेतन वेळेत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या उद्देशाने कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट या प्रणालीचा वापर करून थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच प्रायोगिक तत्वावर चंद्रपूर जिल्ह्याला मान दिला असून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य.) चंद्रपूर या कार्यालयातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर २०२२ चे वेतन डिसेंबर महिन्यात सिएमपी प्रणालीद्वारे मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतन विलंबाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

यापूर्वी खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयक वेतन विभागात सादर केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने कोषागार येथे मंजुरीला जात होते. तिथून मंजुरी घेऊन डी डी जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला पाठवून त्यानंतर धनादेश मंजूर करून शाळेचे खाते असलेल्या बँकेत पाठवून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा होत होते, यात खूप वेळ जात होता पर्यायाने वेतन उशिरा होत होते या सर्व बाबीला फाटा देत महाराष्ट्र शासनास अनेक दिवसापासून सीएमपी प्रणाली द्वारे वेतन अदा करण्याची मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून सतत पत्राद्वारे सुरू होती, त्यानुसारच माहे नोव्हेंबर पेड इन माहे डिसेंबर चे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे अदा करण्याचे आदेश नुकतेच शासनाकडून निर्गमित झाले आहे. ही प्रणाली महाराष्ट्रात फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू केली असून सिएमपी प्रणाली द्वारा वेतन अदा करण्याचा बहुमान चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला आहे. यामागचे कारणही तसेच आहे, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य.) विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत. खाजगी शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याकरिता शालार्थ प्रणालीमध्ये मुख्याध्यापक यांचे संयुक्त खाते क्रमांक आणि इतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खाते क्रमांक व्हेरिफाय करण्याची प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्याने पूर्ण केली आहे.

वेतन पथक कार्यालय चंद्रपूर यांनी एक महिन्यापूर्वीच सर्व खातेदारांचे बँक खाते क्रमांक तपासून निश्चित केले होते. त्यामुळे आयुक्तांनी याचा आढावा घेतला व फक्त चंद्रपूर जिल्ह्याचे खाते क्रमांक तपासून निश्चित केले असल्यामुळे त्यांनी ही प्रणाली फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरती प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. यामुळे वेतन प्रणालीला आता चार ते पाच दिवस कमी लागणार आहे. कोषागारातून वेतन मंजूर झाल्यानंतर सरळ खातेदारांच्या खात्यामध्ये वेतन जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. सिएमपी प्रणालीमुळे चंद्रपूर येथील वेतन विभागांतर्गत खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होणार असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने रामदास गिरडकर यांनी वेतन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोट : १) शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याकरिता शालार्थ प्रणालीमध्ये मुख्याध्यापक यांचे संयुक्त खाते क्रमांक व इतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खाते क्रमांक व्हेरिफाय करण्याचे काम वेतन पथक चंद्रपूर जिल्ह्याचे काम महाराष्ट्रात आघाडीवर होते यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला प्रायोगिक तत्वावर मन मिळाला असून यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन लवकर जमा होणार आहे. : सौ. कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. चंद्रपूर.

२) खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांचे
वेतन करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होण्यास विलंब होत होता, वेतन लवकर जमा व्हावे यासाठी सिएमपी प्रणाली लागू करण्याआधी प्रत्येक कर्मचाऱ्यांचे व मुख्याध्यापकांची संयुक्त खाते व्हेरिफाय करून शालार्थ प्रणालीत जोळायाचे होते याकरिता वेतन विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने मेहनत घेत राज्यात आघाडीव काम केले यामुळेच जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे आता कर्मचाऱ्यांचे पगार लवकर होणार : संजय बोधाडकर, अधीक्षक वेतन विभाग