श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
खेडा पद्धतीने शेत माल खरेदी करुन नये,कृ उ बा स चे आवाहन
नागभीड
कृषी ऊत्पन्न बाजार समिती,नागभीड तसेच उपबाजार तळोधी अंतर्गत नागभीड तालुक्यातील धान या मुख्य पिकाचे विक्रीचा हंगाम सुरु झाला असुन शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु करण्यात आलेले आहे.शेतकऱ्यांना या हंगामात धान पिकावर रोगाचा जास्त प्रादुर्भाव असल्याने ऊत्पन कमी प्रमाणात आला आहे.धानावर रोगाचे सावट असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत.तरी पण नागभीड कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात व तळोधी(बा)च्या उपआवारात मिळुन नविन धानाला २२०० ते २५०० रुपये पर्यत असा चांगला भाव मिळत आहे.त्यामुळे नागभीड तालुक्यातील शेतकरी दोन्ही आवारात धान विक्रीस पसंती देत आहेत.बाजार समिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे विना परवाना व्यापारी व परवानाधारक व्यापारी यांनी सुद्धा खेडा पद्धतीने शेतमाल खरेदी करु नये,अन्यथा आसा प्रकार आढळल्यास त्या संबंधित व्यापाऱ्यावर कार्यवाही करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.शेतकऱ्यांचे धान व शेतमालाचे व्यवहार काही व्यापारी शेतकऱ्यांना भुलथापा देऊन व फसवणूक करुन शेतमाल खरेदी करण्याचा प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आलेले आहे.या करीता कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार क्षेञ नागभीड अंतर्गत व्यापारी व शेतकऱ्यांनी परस्पर व्यवहार करु नये,असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण,उपसभासती रमेश बोरकर,सचिव एस.पी.गुप्ता यांचे कडुन करण्यात आले आहे.खेडा खरेदीद्वारे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे.त्यात सर्व सामान्य शेतकरीमोठ्या प्रमाणात भरडला जातो.या प्रकाराला आळा बसावा यासाठी व्यापाऱ्यांना वारंवार सुचना केल्याची सुचना एस.पी. गुप्ता यांनी माहीती दिली आहे.