श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
राजुरा : तालुका क्रीडा समितीद्वारा शालेय क्रीडा स्पर्धा २०२२ चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली खुर्द या शाळेने खो- खो या स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
१४ व १७ वयोगटातील मुले खो-खो स्पर्धत प्रथम क्रमांक तर १७ वयोगटातील मुली खो-खो स्पर्ध्येत दुसरा क्रमांक पटकवित विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्ध्येत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली खुर्द चा डंका पिटविला आहे. या विजयाबद्दल मुख्याध्यापक रुपेश सोळंके यांनी मुला-मुलींचे कौतुक करून ज़िल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अशीच कामगिरी करावी अश्या शुभेच्छा दिल्या.
विजयी संघाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेतील शिक्षक रवींद्र गोरे, संतोष वडस्कर, प्रवीण गुडपल्ले, अशोक पवार, राजू मडावी, कपिल बोपनवार , साहिल सोळंके शिक्षिका मालू टोंगे, साधना डाहुले, नयना साळवे यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.