.श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
दि.२०/११/२०२२
नागभिड तालुक्यातील कन्हाळगाव येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य व सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी धोबी, वरठि व परीट समाजाचा जात प्रमाणपत्र यासाठी विविध अडचणी येत आहेत यावर उपाययोजना करण्यासाठी व शासन स्तरावर समाजाची वास्तविकता मांडण्यासाठी आयोगाचे सदस्य म्हणून भेट दिली वंचित असलेले माणिक दहीकर यांचे घरी चर्चा केली.
दि.19 .11 .2022.रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे मा.सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी नागभिड तालुक्यातील कन्हाळगाव येथे भेट दिली यात धोबी , वरठी , परीट नावाने असलेला समाज एकच आहे परंतु शासनाने या समाजाला धोबी, परीट 125. तर वरठि असलेल्यांना 166. या अनुक्रमांकावर ठेवल्याने जात प्रमापत्र व जात पडताळणी यासाठी अडचनी जात आहेत , यात पुन्हा आणखी भर मुलाची जात धोबी तर वडिलांची वरठि असल्याने अडचणीत वाढ होत होती ही गंभिर समस्या समाजाचे वतीने शासनाचे निदर्शनात आणून दिली व यात संशोधन करावे अशी मागणी वारंवार करण्यात येत होती त्यामुळे मा . सेवानिवृत्त न्यायमुर्ती चंद्रलाल मेश्राम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य हे ग्रामीण भागात गावात जाऊन वंचित असलेल्या कुटुंबाशी प्रत्यक्ष चर्चा करीत आहेत. त्यानुसार त्यांनी कान्हालगाव येथील माणिक दहिकर यांचे घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली व वरथी , परीट, धोबी, समाज एकच कसे काय आहे याबाबत जाणून घेतले
धोबी ,परीट 125. व वरठी 166. या वेगवेगळ्या नंबर वर ठेवल्यामुळे परंतु तिन्ही जाती एकच असून काही अशिक्षित पणामुळे शाळेत व त्याकाळच्या कोतवाल नोंदित चुकीची नोंद असल्याने प्रमाणपत्र व जात पडताळणी करताना अडचणी जात होती . यामुळे कित्येक दिवसाची मागणी असल्याने शासनाने मा. श्री. चंद्रलालाल मेश्राम मागासवर्ग आयोगाचे सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी कन्हाळगाव येथील माणिक मळूजी दहीकर यांचे घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली यात धोबी, वरठी , परीट ही जात एकच असून यामध्ये रोटी – बेटी चे व्यवहार होतात का ? असे विवीध प्रस्न विचारून माहिती जाणून घेतली . यावेळी प्रशासनाचे इतर अधिकारी व चंद्रपूर जिल्हा संत गाडगेबाबा धोबी , परीट , वरठि समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल माथनकर , नागभिड तालुका अध्यक्ष भारत चूनारकर , सरपंच रमेश घुगुस्कर , माणिक दहिकर, धर्मपाल दाहिकर व त्यांचे कुटुंब हजर होते. यावेळी मा. मेश्राम साहेब यांनी ग्राम पंचायतला सदिच्छा भेट दिली