श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
दि.२०/११/२०२२
सिंदेवाही तालुका कांग्रेस कमिटीचा उपक्रम
रत्नापुर
सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर, आणि श्री. गुरुदेव दुर्गा मंडळ रत्नापुर यांच्या संयुक्तरित्या“ भव्य विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरा” मध्ये ३१०रुग्णांची शस्त्रक्रियासाठी निवड झाली होती. त्यापैकी पहिल्या टप्पा मधे१५० रूग्णनां यशस्वी शस्त्रकिर्या झाल्यानंतर दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी मोफत चष्मे वितरण करन्यात आले होते..उर्वरित रुग्णानां दि१९/११/२०२२ ला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन १६० रुग्णानां सिंदेवाही तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने आणि श्री रमाकांत लोधे माजी जी. प. सदस्य तथा अध्यक्ष तालुका कांग्रेस कमिटी सिंदेवाही यांच्या मार्फत सिंदेवाही तालुक्यातिल रत्नापुर येथे मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेच्या हिताकरिता सातत्याने झटणारा माजी जि. प. सदस्य तथा अध्यक्ष कांग्रेस कमिटी सिंदेवाही रमाकांत लोधे यांची ओळख आहे. आपल्या सिंदेवाही तालुक्यात सातत्याने गोरगरीब जनतेकरिता त्यांचे नावीन्य उपक्रम सुरु असतात.मागील 18 वर्षा पासून अखंडित हि मोतिबिन्दु उच्चाटनाची चळवळ सुरु आहे.आतापर्यंत हजारो रुग्णाना या मोतिबिंदु शस्त्रकिर्याचा लोकांनी लाभ घेतला आहे
आर्यन लेडी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांचा जयंती निमित्त सिंदेवाही तालुका कांग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.या वेळी श्री. रमाकांत लोधे माजी जि. प. सदस्य चंद्रपुर तथा तालुका कांग्रेस कमेटी सिंदेवाही,सेवाग्राम येथील डॉ. जैन, मंगेश मेश्राम सदस्य ग्राम. प. रत्नापुर आणि पाहुने मंडळीनी श्रीमती इंदिरा गांधीजी यांचा प्रतिमेला पुष्प व माल्यार्पण करून आदरांजली वाहून अभिवादन करुण भव्य मोफत चष्मे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्व रुग्णांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले.
या प्रसंगी या कार्यक्रमात मा. रमाकांत लोधे माजी जि. प. सदस्य चंद्रपुर तथा अध्यक्ष कांग्रेस कमिटी सिंदेवाही, मंगेश मेश्राम ग्राम पंचायत सदस्य रत्नापुर,संजय गहाने माजी त. मु. स अध्य्क्ष रत्नापुर, वामन जीवतोड़े, सामाजिक कार्यकर्त कपिल मेश्राम, संदीप कापगते ,सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील डॉ.प्रांजल जैन, डॉ. कराडे, अविनाश भोगळे व डॉक्टरांची चमू,आणि कांग्रेस कार्यकर्तेे उपस्थित होते.