श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर
दि.२१/११/२०२२
राजुरा
बहुतांश ठिकाणी पारा १३ वर
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हुडहुडी भरली आहे. त्यात काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांपर्यंत पोहचला आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत असल्याने दिवसा ऊन असतानाही गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरसारखी थंड वातावरणाची अनुभूती आता विविध ठिकाणी अनुभवायला मिळते आहे.suffer from cold
यावर्षी पाऊस जास्त प्रमाण पडल्यामुळे थंडीही मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचे मत जाणकार सांगत आहे. सध्या वातावरणात गारवा जाणवू लागल्याने नागरिकांकडून बचावासाठी स्वेटर, मफलरसारख्या उबदार वस्तूंचा सहारा घेतला जातो आहे. वातावरणातील वाढत असलेला गारवा पाहता नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवून ऊब घेतानाचे चित्र शहरीसह ग्रामीण भागात जागोजागी पाहायला मिळत आहे. मॉर्निंग वाकला घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसत आहे.
शेतात अजूनही बहुतांश रब्बी च्या पेरण्या शिल्लक असून खाली जागेला पाणी देण्यासाठी रात्रोला शेतकऱ्यांना शेतात कडक थंडीचा सामना करीत पाणी द्यावे लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून शेत पिकांच्या बचावासाठी थंडीतच जागल करावी लागत आहे. वातावरणातील गारवा असाच काही दिवस राहल्यास रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना मोठा सामना करावा लागणार असून प्रत्येकाच्या अंगात हुडहुडी भरल्याशिवाय राहणार नाही.