श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
दि. २१/११/२०२२
देसाईगंज
देसाईगंज शहरातील ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० खाटांची व्यवस्था आहे, देसाईगंज शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात लगतच्या लाखांदूर, अर्जुनी/मोर, कुरखेडा, आरमोरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारार्थ येत असल्याचे दिसून येत आहे , दिवसेंदिवस रुग्णांच्या होणाऱ्या वाढीमुळे सोयीसुविधा कमी पडू लागल्या आहेत. नवनवीन साथीच्या रोगात सुद्धा अचानकपणे वाढ होत असते , एखादा मोठा अपघात घडल्यास रुग्णांना उपचारार्थं येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येते. अश्यावेळेस तिथे असणारी उपलब्धता हि तोकडी पडू लागल्याने ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करावे, अशी मागणी देसाईगंज शहरवासियांतर्फे केली जात आहे.