श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
दि. २१/११/२०२२
देसाईगंज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी व आमदार गोपीचंद पडळकर यांचा तीव्र निषेध.
शिवसेना आरमोरी विधानसभा तर्फे जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात थोर महापुरुषांबद्दल बेताल, अपमाजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला चपला, जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला.#Bhagatsing koshyari
एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी व गोपीचंद पडळकर यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमाजनक वक्तव्य केले होते, संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेने तर्फे निषेध होत असून त्याचाच एक भाग म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने देसाईगंज येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले , यावेळी तीव्र घोषणा देण्यात आल्या, मुख्य मार्गवरील वाहतूक थोड्या वेळासाठी बंद होती. # Gopichnad Padalkar
या प्रसंगी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी जिप सदस्य दिगंबरजी मेश्राम,तालुका प्रमुख नंदू चावला,शहरप्रमुख विकास प्रधान,विभाग प्रमुख विलास ठाकरे, काँग्रेस चे माजी सभापती जमाल शेख, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सपाटे,बल्लू कुळमेथे, मनोहर पिलारे,अशोक मेश्राम, कृष्णा करणकर, सोमेश्वर पाटील, गोपाल मेश्राम, रामकृष्ण मुळे, प्रवीण मांडवकर, डिम्पल चावला, जसपाल चावला व शेकडो शिवसैनिक हजर होते.