शहराला दिशा देणारा संविधान चौक बनेल :- आमदार भांगडिया

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

दि.२९/११/२०२२

चिमूर 

संविधानातील प्रास्तविकेच्या सुरूवातीच्या दोन ओळीत सर्व काही आहे. जगाच्या पाठीवर आपल्या संविधानासारखे संविधान नाही. डॉ बाबासाहेब मुळेच आपण श्वास आणि घास घेतो. संविधान सर्वाच्या हक्काच आहे. जिवनाची सुरुवात संविधानाने करा जिवण सार्थक होईल संविधानचे जतन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस स्टेशन जवळील संविधान चौकाचे शासकीय निधीतून सौंदर्यीकरण करत चौकात भारतीय राजमुद्रा बसवून शहराला दिशा देनारा संविधान चौक बनेल. असे कार्यक्रमाचे उद्धघाटक आम. किर्तीकुमार भांगडीया संविधान सन्मान दिन समारोह प्रसंगी संत गाडगे महाराज परिसरातील वामनदादा कर्डक विचार मंचावरून बोलत होते.

संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने वडाळा (पैकु) चिमूर येथील आदर्श विद्यालयाच्या पटांगणात शनिवार ला संविधान सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान सन्मान दिन निमित्त बाईक रॅली काढून शहरातील थोर पुरुष, चिमूर क्रांती स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे, स्मृती स्थळ, बौद्ध विहार, येथे माल्यापर्ण, अभिवादन करन्यात आले. संविधान चौकातील फलकांला आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते माल्यापर्ण करून व कार्यक्रमादरम्यान संविधान प्रास्ताविकेचे वाचन कु पाकी पवण ताकसांडे यांनी केले दरम्यान कार्यक्रमाला सुरुवात करन्यात आली. आझाद वार्ड चिमूर येथील विद्यार्थीनी निकिता देवचंद टेभूरकर ने नुकतिच विक्रीकर निरिक्षक ची परिक्षा पास करत राज्यातुन अनूसूचित जाती मुलींमध्ये चौथी आली असता यावेळी सत्कार व शुभम राजेंद्रप्रसाद भगत सिने अभिनेता यानी मराठी सिनेसृष्टीत चिमूरचे नाव लौकीक केल्याबदल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करन्यात आला.

कार्यक्रमाचे मादर्शक संविधानाचे अभ्यासक ॲड भुपेंद्र रायपुरे म्हणाले की, भारतीय संविधान व स्वातंत्र्य यांचा फार मोठा संबध आहे. जागतिक अभ्यासक आजही भारतीय संविधानाला सामाजिक परिवर्तनाचा दस्तावेज समजतात. वेगवेगळ्या चालीरिती यावेळी या सर्वाना एका सुत्रात बांधनारा ग्रंथ म्हणजेच संविधान होय. संविधान सन्मान दिन समारोह समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक संविधानाचे अभ्यासक विचारवंत ॲड भुपेंद्र रायपुरे प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक मनोज गभणे भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वारजूकर, घनश्याम डुकरे, मनीष तुम्पल्लीवार, एकनाथ थुटे आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन सुरेश राऊत यांनी केले. प्रास्तावीक नंदण लोखंडे यांनी केले तर आभार विनोद गेडाम यांनी केले कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते दरम्यान रात्रो ला प्रकाश मेश्राम प्रस्तुत सामाजीक प्रबोधनाचा कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला.