श्री.अरुण बारसगडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भद्रावती , दि.३/१२/२०२२
आयुध निर्माणी चांदा येथील आयुध निर्माणी सहकारी पत संस्था येथे निवडणुक घेण्यात आली. यामध्ये संस्थेच्या संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली. मजदुर एकता पॅनलने बहुमत मिळवत संचालक मंडळाची स्थापना केली. यात संस्थेच्या अध्यक्षपदी संदिप हजारे, उपाध्यक्ष अहेसान खान, सचिव राजेन्द्र सिन्हा, संचालक दत्ता खेडकर, प्रशांत झाडे, सपना मनिष राज अशी निवड करण्यात आली. सभासदांचे हित हेच संस्थेचे हित अशी शपथ यावेळी नविन कार्यकारिणी कडून घेण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या स्थापनेसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी मजदूर युनियन चांदा, भारतीय सुरक्षा कर्मचारी संघ, एआयएनजीओ तसेच आयओपीजीओए संघटना यांचे मोलाचे योगदान मिळाले. आयुध निर्माणी सहकारी पत संस्थेच्या संचालक मंडळ तसेच सभासदांच्या हितासाठी गुलाब चौधरी, प्रकाश हरिदासन, शितल वालदे, गुप्ता, प्रविण गेडाम, राम पुंडे, रूपेश बोंडे, विवेक वाढई, राकेश पवार, संजय सिंह, प्रकाश गडपल्लीवार, सुशांत मिलमिले, प्रविण तुराणकर, मनिष मत्ते, जितू नायक, उल्हास नगराळे, प्रणय वाघमारे, मनोज रामटेके यांनी प्रयत्न केले.