श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
पेंढरी कोकेवाडा जी प शाळा येथील प्रकार
रत्नापूर दि.७/१२/२०२२
सिदेवाही तालुक्यातील पे ढरी कोके येथे वर्ग १ ते 7 पर्यंत जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा कार्यरत असुन गावातील व परीसरातील गावातील जवळपास 183 विद्यार्थी येथे विद्या दान घेत असुन त्यांचे शिक्षणा साठी शिक्षण देणारे शिक्षक कमी आहेत विद्यार्थी पटसंख्येचे नुसार चार सहाय्यक शिक्षक दोन विषय शिक्षक व एक मुख्याध्यापक असे सात पदे मंजुर आहेत दोन वर्षापासुन एका सहा शिक्षकांचे पद येथे रीक्त आहे तरीपण बाकी शिक्षक हे यांची भरपाई भरुन काढत होते आणी शिक्षण देत होते परंतु या वर्षाला 7 सप्तेबर 2022 ला मनोज मानकर विषप शिक्षक ( विज्ञान ) यांची जील्हा बदली झाली त्यामुळे ते नागपूर येथे बदली होवून गेलेत आणी आता त्यांचे बदली मुळे वर्ग 6 व 7 ला फक्त एकच शिक्षक कार्यरत राहीले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणीक नुकसान होत आहे कारण एकच शिक्षक दोन वर्ग कसेकाय सांभाळणार आहेत यापूर्वी 20 आक्टो 2022 ला ललीता लोहबरे यांची नियुक्ती केली होती पण परत त्याना जुन्या त्यांचे शाळेत वापस बोलावण्यात आले त्यामुळे शाळेत मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकाने व शाळा व्यवस्थापन समितीचे लक्षात आले आहे ही मुल्यांच्या भवितव्याची बाब हेरुण येथील शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधीकारी व गावकरी जनतेनी सिंदेवाही तालुका संवर्ग विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे की आम्हाला आमच्या शाळेत सात दिवसात शिक्षकांचे पद दयावे अन्यथा शाळा ला कुलुप ठोकुन शाळा बंद करु असा सज्जड दम भरला आहे अधिकारी वर्ग यावर काय निर्णय घेतात याकडे पेंढरी वासीय जनतेचे लक्ष लागले आहे