श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावरगाव, दि. ७/१२/२०२२
एम. के. एस. कॉन्ट्रॅक्ट कंपनी द्वारे या परिसरात करोडो रुपये किंमतीचे कामे केली जात असून तळोधी बा. शिवाजी चौक पासून ते रज्जाक कबाडी दुकान पर्यंत चार पदरी सिमेंट क्रांक्रिट रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून सहा महिन्यात या रोडला भेगा पडल्याने या कामाच्या दर्जा कसा असेल असे नागरिक यांच्या कडून चर्चिला जात आहे.
तळोधी ते गांगल वाडी आरमोरी या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. दिवसभर तळोधी ते आरमोरी बसेस च्या चार ते पाच फेरी होतात. या मार्गावर वर्षे भरापासून संथ गतीने काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्धवट कामे करून ठेवले आहे. तळोधी बा. येथील शिवाजी चौक पासून ते रज्जाक कबाडी दुकान पर्यंत सिमेंट क्रांक्रिट रोडचे बांधकाम करण्यात आले. परंतु या ठिकाणी निकृष्ट दर्जाची रेती व सिमेंट वापर केल्याने जागोजागी या रोडला भेगा पडले आहेत. तसेच या रोडचे बाजूला नालीचेसुध्दा काम ओबडधोबड केलेले आहे. नालीच्या बाजूला मातीचे भरणा केले जात असताना बांधकाम विभाग झोपे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत आहे. सहा महिन्यात तच या मार्गावर जागोजागी भेगा पडून उखडून जात असताना कंपनी व संबंधित बांधकाम विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी संबंधित वरिष्ठ विभाग यांनी सहा महिन्यात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपनी वर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.