श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
खडसंगी, दि. ९/१२/२०२२
चिमूर नगरपरिषदच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी खडसंगीच्या ग्रामपंचायत हद्दीत खोदकाम
अवैधरित्या खोदकाम करीत असल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप
तात्काळ काम बंद न केल्यास पोलीसात करणार तक्रार
चिमूर नगरपरिषदला वाढीव पाणी पुरवठा देण्यात आला. सदर पाणी हे चारगाव धरण येथून चिमूरमध्ये पाणी येणार आहे. त्याकरिता खडसंगी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सकसआहारच्या जागेत खोदकाम सुरू करण्यात आलेले आहे. सदर खोदकाम अवैध असून गावकऱ्यांची कोणतीही संमती न घेतल्याचा आरोप काही ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे.
नगर विकास विभाग यांच्या संदर्भीय आदेशानुसार नगर परिषद, चिमूर करिता वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर असून चिमूर वाढीव पाणी पुरवठा योजनेची आपले खडसंगी क्षेत्रातील सध्यस्थितीत असलेली नगर परिषद, चिमूरची टाकी लगत नवीन (BPT) एक टाकी उभारणे असून सदर टाकी उभारणे करिता आपले ग्रामपंचायत, खडसंगीची नाहरकतची आवशकता आहे. खडसंगी हद्दीत सध्यस्थितीत असलेली नगर परिषद, चिमूरची पाण्याची टाकी नगर परिषद, चिमूर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात वापरात नसल्याने सदर टाकी आपले ग्रामपंचायत खड्संगी ला वापराकरिता हस्तांतरित करण्यात येत आहे. असे दिलेल्या पत्रात सांगितले आहे. सदर पाण्याची टाकी आपले ग्रामपंचायतला हस्तांतरित करून नवीन टाकी उभारणी करिता नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे करावे. असे नगरपरिषद चिमूर अंतर्गत खडसंगी ग्रामपंचायतला पत्र देण्यात आले होते.
मात्र यावेळी खडसंगी ग्रामपंचायत मध्ये प्रशासकराज असल्यामुळं यावर गावातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन यात गावातील लोकांचे मत घेऊन समोरील कारवाई करायला पाहिजे होती. मात्र तसे करण्यात आले नाही. ग्रामपंचायत सचिवांना गावातील कोणतीही मालमत्ता कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. यासाठी गावातील नागरिकांचे ग्रामसभेत मत घेऊनच नाहरकत द्यायला पहिजे. मात्र असे न करता ग्रामपंचायतने नगर परिषद चिमूर ला नाहरकत प्रमाणपत्र देऊन टाकले. या दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत खडसंगी कडून प्रमाणपत्र देण्यात येते की महाराष्ट्र स्वर्णजयंती नग्रोत्थान महाभियान अंतगर्त चिमूर पाणीपुरवठा योजना ता. चिमूर जिल्हा चंद्रपूर या योजेन करिता खडसंगी येथे जुन्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी नवीन एक लक्ष लिटर क्षमतेचे (BPT) पाण्याची टाकीचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायत खडसंगीची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. करिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. असे पत्र देण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत खडसंगीचे सदस्य रूपचंद शास्त्रकर यांच्या लक्षात जेसीबी ने खोदकाम सुरू असल्याचे लक्षात येताच काम तात्काळ बंद करण्याचे सांगितले मात्र ठेकेदारांनी काम बंद न करता सुरूच ठेवले. व नगरपरिषद ला आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील जागा कशी काय द्यायची असा प्रश्न उठवला. यालाही ठेकेदार न जुमानता काम सुरूच ठेवले. सदरची बाब गावातील नागरिकांच्या लक्षात आणून देण्यात आली यावर ग्रामपंचायत सदस्यांसहित गावातील नागरिकांनी आक्षेप नोंदवला असून, तसे गावातील नागरिकांच्या सह्या घेऊन एक पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे सदर पत्रात म्हटले आहे की, खडसंगी येथील ग्राम पंचायतने राखुन ठेवलेल्या सकसआहार जागेमध्ये चिमुर नगरपरिषदच्या पाण्याच्या टाकीचे खोदकाम चालु आहे. त्याच्या कामाला कसल्याही प्रकारची ग्रामपंचायतची व ग्राम सभेची कसलीही परवानगी नसतांना अवैधरित्या खोदकाम सुरू आहे.
या चिमूर नगरपरिषदेच्या होणाऱ्या पाण्याच्या टाकीमुळे खडसंगी येथील गावकऱ्यांना कसल्याही प्रकारचा फायदा नसतांना गावकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काम त्वरित बंद करण्यात यावे. तरी नगर परिषदच्या पाण्याच्या टाकी बांधकाम संबंधात ग्रामसभेतून नागरिकांची मते व परवानगी घेऊनच करवाई करावी असे ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.