नायलाॅन मांजामुळे पोंभूर्णा नगरपंचायतीचे लेखाधिकारी जखमी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

पोंभूर्णा/०९ डिसेंबर २०२२

पोंभुर्णा नगरपंचायतीचे लेखाधिकारी ऊत्कर्ष हनुमानप्रसाद शर्मा हे दिनांक ८ डिसेंबर ला दुपारी ३ वाजता दरम्यान कार्यालयीन कामानिमित्त चंद्रपुर वरुन बल्लारशा येथे दुचाकीने जात असतांना जुनोना चौकात ऊड्डान पुलाजवळ त्यांचेवर नायलाॅन मांजा अडकला, मांजाला दुर करतांना त्यांचा हात अक्षरशः कापला गेला. त्यामधुन बरेच रक्त गेले.त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.हाताला टाके मारण्यात आले आहे.जिवावर आले मात्र हातावर निभावले. चंद्रपुर येथील पोलीस विभाग आणि महानगरपालीका यांनी नायलाॅन मांजा विक्रेत्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

दरवर्षी तिळ संक्रातीनिमित्त पतंग ऊडविण्याची पंरपरा आहे.त्याकरीता महिनाभर अगोदर पासुनच पंतग आणि मांज्याची विक्री केली जाते. बाजारात मात्र मोठ्या प्रमाणात नायलाॅन मांजाची विक्री केली जात आहे.नायलाॅन मांजामुळे दरवर्षी अशा घटना घडतात, मात्र कठोर कार्यवाही होतांना दिसत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात सर्रासपणे ,डोळेझाकुन नायलाॅन मांजाची विक्री केली जाते. नायलाॅन मांजाची मागणी सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. अश्या या नायलाॅन मांजामुळे जिवघेण्या घटना घडु नये याकरिता नायलाॅन मांजा बाळगणे ,विक्री करणे ,साठा करणे यांचेवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालीका यांनी कठोर कार्यवाही करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनतेतर्फे केली जात आहे