प्रत्याक्षिकेतून उतरविले अंधश्रद्धेचे भूत- नंदवर्धन गावात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

आक्सापूर,दि.२२/१२/२०२२

पोलीस विभाग गोंडपिपरीच्या पुढाकारातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम नुकताच तालुक्यातील नंदवर्धन गावच्या छत्रपती शिवाजी चौकात पार पडला.कार्यक्रमाला तहसीलदार के.डी.मेश्राम,ठाणेदार जीवन राजगुरू,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर,सचिव धनंजय तावाडे उपस्थित होते.यावेळी राजगुरू यांनी आपल्या प्रास्ताविकेतून जादूटोणाविरोधी कायदा समजावून सांगितला.तहसीलदार मेश्राम यांनी अंधश्रद्धा ही समाजाला लागलेला शाप आहे.त्यामुळे आपल्याला सामाजिक व आर्थिक प्रगती साधता येणार नसल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक दहागावकर,सचिव तावाडे यांनी जादूटोणा म्हणून भोंदुबाबा जनतेला कसे फसवितात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.अंधश्रद्धेला बळी न पळता विज्ञानवादी वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी मान्यवरांनी प्रात्यक्षिक सादर करून लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी गावातील नागरिक,विद्यार्थी,तंटामुक्त समिती पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.