चामोर्शी तालुका प्रतिनिधी
चामोर्शी, दि. २२/१२/२०२२
चामोर्शी क्रीडांगणच्या अभावामुळे येथील बस स्थानकाच्या जागेवर ३०० मिटरचा ट्राक व १०० मिटर गोळा फेक च्या ग्राउंड ची निमिॅती पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या युवकांनी केली.
गडचिरोली जिल्हा हा रोजगार विरहीत असल्याने जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगाराची मोठी फौज तयार झाली आहे. हाताला काहीतरी काम मिळावे. अशी आशा प्रत्येक युवक बाळगूण आहेत. दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलीस दलात होणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी नशीब आजमावण्यासाठी चामोर्शी शहरातील यशोधरा विद्यालयाच्या मागील परिसरात चामोर्शी येथील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकानी पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदानाची निर्मिती केली आहे.
कित्येकदा क्रीडांगणाची निर्मिती साठी लोकप्रतिनिधी कडे येथील स्थानिक युवकांनी साकडे घातले आहे परंतु याचा काहीही उपयोग जाला नाही अखेर त्रस्त युवकांनी श्रमदाणातुन तात्पुरते क्रीडांगण तयार केले.
येत्या काही दिवसांमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे
पोलिस शिपाई पदासाठी लागणाऱ्या मैदानाची निर्मिती
मैदानीखेळ व शारीरिक चाचणी मध्ये चागले गुण प्राप्त करुन पोलिस दलात भरती कसे होता येईल या उद्देशाने व चामोशीॅ मध्ये बेरोजगार युवकांच्या रोजगार मिळावे या उदेशाने सर्व पोलिस भरतीची तयारी करणारे युवकांनी प्रत्येकी १०० रुपये काढून मैदानावर ३०० मीटरचा ट्रायक १०० मिटर गोळा फेक चा मैदान वगैरे बनवून त्या बस स्थानकाच्या जागेवर तात्पुरते क्रिडागन बनवण्यात आले आहे आणि त्या ग्राऊंड वरती मोठ्या उस्तावात पुजा व नारळ फोडून व १०० मीटर रनिंग मारुन त्या जागेवर पोलिस भरतीची तयारीला सुरवात करण्यात आली यावेळेस उपस्थित पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी सुरज नैताम, चेतन मेश्राम, युवराज काटवले, प्रफुल्ल चलाख ,बंटी कोवासे, अक्षय सोरते, विनोद बुरांडे ,प्रेमसागर वासेकर, सुरज सोयाम, निखिल भाडेकर, करण शेटृटे, चरन गडकर, अरपित दुधबावरे, श्रीकांत श्रीमंतवार, आदित्य नैताम, आयुष साखरे, संनी कोटागले, विशाल कटारे, आदिल शेख, महिला पोलिस शिपाई पदाच्या तयारी करणाऱ्या मनिषा सातपुते, काजल नैताम, साधना नवले ,प्रतिक्षा चादेंकर, लक्ष्मी सातपुते, तेजस्विनी बुरांडे, रिना सोनटक्के, गुणगुन खडाळे ,आश्विनी उंदीरवाडे, पायल दुधबळे, सलोनी साखरे पोलिस शिपाई भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी आधी उपस्थित होते
चामोर्शी शहरात क्रीडांगणाचा विषय गंभीर असून, क्रीडांगणाच्या जागेवरील अतिक्रमण तत्कालीन तहसीलदारानी काढले होते पण परत अतिक्रमण करण्यात आले अशी माहिती आहे. प्रशासनाने क्रीडांगणाचा विषय गांभीर्याने घेऊन क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे