आणि ती घरीच उपोषणाला बसली

प्रेसनोट 

बल्लारपूर,दि. २२/१२/२०२२

पेपरमिल कंपनीत मागील १२ ते १५ वर्षापासून काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांना जेष्ठते (Seniority) नुसार तात्काळ स्थायी करण्यात यावे. यासाठी भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरीबी, उपासमारी व शोषण मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे लक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरज दादा ठाकरे यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमान पक्षाची महिला आघाडी बल्लारपूर विधानसभा अध्यक्षा प्रिया झांबरे यांचे बल्लारपूर पेपरमिलचे अधिकारी व काँग्रेसचे युनियन लिडर यांचे हिटलरशाही मनमानी कारभार व कामगारांवर होणाऱ्या अन्याय व शोषण विरोधात आमरण उपोषण करीत आहेत.

विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने यासाठी कलम ३७ चे कारंणाने परवानगी नाकारल्यामुळे, बल्लारपूर पेपरमिल च्या कामगारांच्या कल्याणाकरिता हे उपोषण त्या घरीच करीत आहेत.

बल्लारपुर पेपरमिल मध्ये ठेकेदारी कामगार दिवस रात्र स्वतःचे रक्त जाळुन कंपनीला जिवंत ठेवण्याचे काम करतात. कंपनी व युनियन वाले त्यांनाच सुख सोई देण्याचे सोडुन फक्त कांग्रेस मध्ये असणाऱ्या लोकांना स्थायी भरती करण्यात येते हे चुकीचे आहे म्हणुन यावर प्रियाताई झांबरे यांनी आपला आवाज बुलंद केला. युनियन ही सर्व कामगारासाठी आहे. मग कांग्रेस वाल्यांनाच प्राधान्य का?? जुने कामगार कुठे जाणार?? युनियन लिडर नि पेपरमील विकत घेतली काय?? बाकीच्या कामगारांना गुलामगीरीत ठेवण्याचे कारण काय?? अन्याया विरुद्ध आवाज उचलणाऱ्या कामगाराला कामावरुन काढण्याची पद्धत युनियन लिडर नी अद्याप का बंद केली नाहि ?? या मागील फार मोठा उलघडा युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी करणार असल्याचे सांगीतले.

प्रोडक्शन मध्ये ठेकेदारी कामगारांचा जास्त प्रमाणात वाटा असतो म्हणून पेपरमिलच्या ठेकेदारी कामगारांना सुपर बोनस २०% ते ३०% देण्यात यावे, ठेकेदारी कामगाराचे कामाच्या ठिकाणी अपघात किंवा आकस्मीत मृत्यु झाल्यास त्यांच्या उपचाराकरीता बल्लारपूर पेपरमिलने खर्च करावा तसेच कामगार व त्याच्या परीवाराला नुकसान भरपाई कंपनीने भरून द्यावे. ठेकेदारी कामगाराचे वेतन दर माह १० तारखे पर्यंत होणे अनिवार्य आहे. कारण वेतन उशीरा मिळाल्यामुळे ठेकेदारी कामगार हे कर्ज बाजारी होतात. त्याचा त्रास संपूर्ण परिवाराला सोसावा लागतो.

पेपरमिल कंपनीमध्ये सिव्हील डिपार्टमेंट मध्ये १५ दिवसात पत्रकार असलेल्या भोजेकर यांना स्थायी कसे करण्यात आले ? याचे कोडे च असून ,कोणत्या नियमाखाली अशी नेमणूक करण्यात आली याचे हि स्पष्टीकरण द्यावे ,
४ ते ६ महिने पासून काम करणाऱ्यांना ७ नंबर मधील क्रिष्णा यादव व त्याच्या सोबत तीन लोकांना परमनंट करण्यात आले. तसेच ४ ते ५ वर्ष काम करणारे ६ नंबर मधील माजी सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, पिर मोहम्मद, प्रमोद बोधे तसेच पेपरमिल च्या दवाखान्यात ५ ते ६ वर्ष काम करणाऱ्या अजय साळवे यांना कोणत्या आधारावर स्थाई करण्यात आले ?. यांची सुध्दा माहिती उपोषण करता तसेच जनतेच्या समोर स्पष्टीकरण देण्यात यावे.

पेपरमिल कंपनी हि काँग्रेस युनियन लिडरची आहे. की थापर ची आहे याचे सुध्दा स्पष्टीकरण देण्यात यावे. युनियन हि कामगारांच्या हितासाठी आहेत की फक्त काँग्रेसच्या सेवे मध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना स्थायी करण्यासाठी बसली आहे याची माहिती पेपरमिलच्या अधिकाऱ्याने तसेच जिल्हा प्रशासनाने दयावी.

पेपरमिल द्वारा बल्लारपूर शहरामध्ये होत असलेले प्रदुषण थांबविण्यात यावे.
बल्लारपूर पेपरमिल मध्ये विषारी पि.जी. प्लॅन्ट च्या गॅस मुळे तसेच चुना प्लॅन्टमुळे निघणारी चुन्याची धुळ शेता मध्ये व गणपती वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे ते त्वरीत थांबविण्यात यावे.

इत्यादी मागण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाची महिला आघाडी बल्लारपूर विधानसभा अध्यक्षा प्रिया झांबरे या उपोषणाला बसल्या असून कामगारांना होणारा त्रास त्यांच्या परिवाराला सोसावा लागतो. त्याकरीता दि.२२/१२/२०२२ चे उपोषण कर्मचाऱ्यांच्या परिवारांचे आहे. सदर प्रकाराची माहिती युनियन चे हेड आणी कांग्रेस पार्टी चे लिडर नरेश बाबु पुगलीया यांना सुद्धा कामगारांची गंभीर परिस्थिति व अधिकाऱ्यांची व युनियन लिडर ची मनमानी ,हिटलरशाही ची माहिती देण्यात आली ,पेपर मिलच्या ठेकेदारी कामगारांच्या व बल्लारपूर शहरातील जनतेच्या हिताच्या मागण्या असल्याचे प्रिया झांबरे यांनी कळविले आहे.