राज्य सरकार विरोधात आदिवासींचा आक्रोश मोर्चा -विशाल मोर्चा बघुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा मोर्चाला समोर येण्यास नकार

न्यूज जागर प्रतिनिधी नागपूर 

नागपूर,दि.२२/१२/२०२२ 

आदिवासी एकता युवा समितीने दिले आमदार कपिल पाटिल यांना निवेदन

नागपूर हिवाळी अधिवेशनात दि. 21 डिसेंबर ला आदिवासी कृती समिती व आदिवासी समाजाच्या विविध संघटना व पक्षाच्या वतीने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कृती समितीने बोगस अधिसंख्या पद भरती, ATC च्या आयुक्त पदी नियुक्त केलेल्या नयना गुंडे यांची हकालपट्टी, आदिवासी विद्यार्थ्यांना phd साठी शिषववृत्ती, पेसा कायद्याची अमलबजावणी करणे आदि प्रमुख मागण्यासह विभिन्न 35 मागण्यांचा समावेश होता. मोर्चा मध्ये राज्यभरातून लाखाच्या वर आदिवासी बांधव आपल्या मुला/बाळासह व आपल्या पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक वाद्यासह उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी नागपूरच्या रस्त्यावर उतरून राज्य सरकारला जाब विचारू लागला. सदर मोर्चा हा यशवंत स्टेडियम वरुन निघून विधानभवनावर धडकला. आदिवासींच्या या अभूतपूर्व मोर्चाला बघून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्री सुद्धा मोर्चाला समोर येण्यास नकार दर्शविल्यामुळे आदिवासींमध्ये राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनसह राज्य सरकारचा निषेध नोंदवत प्रचंड घोषणा देत आंदोलन स्थळ दनाणून सोडले. यावेळी कांग्रेस चे विजय वडेट्टीवार, रामसाय कोरेटी व प्रहार चे बच्चू कडू यांनी मोर्चास भेट देऊन आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाबाबत सरकारला या अधिवेशनात जाब विचारलं जाईल असे आश्वासन देण्यात आले.


यावेळी आदिवासी एकता युवा समितीच्या शिष्टमंडळाने विधानभवनात जाऊन मा. आमदार कपिल पाटिल यांना निवेदन देऊन आदिवासी समस्याचा पाढा वाचला यावेळी कपिल पाटिल यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले कि, जो पर्यत मागण्यांची पुर्तता होत नाही तो पर्यत मी तुमच्या सोबत असुन तुम्ही ज्यावेळी मला बोलवाल त्यावेळी मि हजर असेन व वेळ पडल्यास आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर सुध्दा उतरून राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळात आदिवासी एकता युवा समितीचे उमेशभाऊ ऊईके, प्रदिप कुलसंगे, मंगेश नैताम, गिरीष ऊईके, संजय मेश्राम, प्रफुल्ल कोडापे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.