श्री.श्याम यादव कोरची प्रतिनिधी
दि. २१/१२/२०२२
वीर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ अलीटोला च्या सौजन्याने अलीटोला येथे 20 व 21 डिसेंबरला दोन दिवसीय डे ओपन प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 20 डिसेंबरला या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सहअध्यक्ष ऐनसिंग हारमे उपसरपंच ग्रामपंचायत अलिटोला, उद्घाटक आशिष अग्रवाल तालुका अध्यक्ष अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची, सहउद्घाटक बाळकृष्ण मारगाये व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ बेतकाठी तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र सहारे, गणेश गावडे सरपंच अलीटोला, ग्रामपंचायत सचिव धाकडे, सुनील सयाम सरपंच ग्रामपंचायत मसेली, मेहरसिंग काटेंगे ग्रामपंचायत सदस्य नवरगाव, सौ लताताई काटेंगे ग्रामपंचायत सदस्य अलिटोला, राजीमसाय बोगा पोलीस पाटील अलीटोला, सौ मानभाई कुमरे सदस्य ग्रामपंचायत अलीटोला आदी उपस्थित होते.
आजच्या या धावपळीच्या युगात व तंत्रज्ञानाच्या युगात आपण मैदानी खेळापासून दुरावत चालले असून शारीरिक व बौद्धिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. कबड्डी सारख्या मैदानी खेळाने शरीर सुदृढ राहतेच व बुद्धीच्या विकासाला सुद्धा चालना मिळते असे प्रतिपादन आपल्या उद्घाटनीय भाषणात आशिष अग्रवाल यांनी केले. तर आज कबड्डी या खेळाचे भारतासमवेत बाहेर परदेशात सुद्धा महत्त्व वाढत असल्याचे दिसून येत आहे असे प्रतिपादन रामसुराम यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश कुमरे, आशिष हिडामी, नरेंद्र काटेंगे, वीरू बोगा, राकेश नरेटी, अविनाश हिडामी, आवेश बोगा, सुनील काटेंगे, नितीन कुमरे, गणेश सरपंच, रुपेश कुमरे, अमोल जाडे व इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.