चामोर्शी,दि.२७/१२/२०२२
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग गडचिरोली यांचे आदेशान्वये कृषक हायस्कूल येथे दि . २६ ते ३१ डिसेबर पर्यत सह शालेय उपक्रमातर्गत शिक्षणा सोबत विद्यार्थ्यानच्या कल गुणाना वाव देण्यासाठी व शालेय जिवणात खेळा विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी वर्ग ५ ते वर्ग १० वी पर्यतच्या विद्यार्थ्याच्या शाळे अंतर्गत मुला – मुलीची कबडडी , क्रिकेट , धावने , लाब उड्डी , उंच उड्डी , गोळा फेक अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत .
काल दि . २६ डिसेबर रोजी कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन कृषक सुधार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रावण दुधबावरे याचे हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय कबड्डीचा सामना वर्ग ५ व वर्ग ६ यांच्यामध्ये घेण्यात आला. हा सामना रोमांचक चुरशीचा ठरला .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रावण दुधबावरे , नगरपचायतचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे , क्रिडा शिक्षक मोरेश्वर गडकर , शिक्षक अविनाश भांडेकर , लोमेश्वर पिपरे , गिरीष मुजमकर , जांसुन्दा जनबंधू , अरुण दुधबावरे व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसख्येने उपस्थित होते .