प्रियाताई झांबरे यांचा बेमुद्दत अन्न त्याग उपोषणाचा साहवा दिवस
बल्लारपुर : मागील पाच दिवसापासुन बल्लारपुर नगरपरिषद जवळ पेपरमील च्या मैनेजमेंट व युनियन लिडर ची हिटलरशाही व कामगारांसोबत होणाऱ्या शोषण व अन्याया विरोधात बेमुद्दत अन्न त्याग उपोषणाला बसल्या आहेत. जागर न्युज चे प्रतिनिधि हे उपोषणाचा संबधीत विचारणा केले असता प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले की शासन प्रशासनाच्या कामावर विश्वास नाही. तात्काळ कधीच कोणाला न्याय देत नाहीत, कोणत्याही अर्जावर दखल घेत नाही. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांची व राजकीय पक्षाची हिम्मंत दिवसांदिवस वाढतच जात आहे.
पेपरमील च्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला पत्रव्यवहाराच्या माध्यमातुन अनेकदा कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल ची माहिती दिली परंतु पेपरमील चे व्यवस्थापक व युनियन लिडर नी किंवा जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, प्रदुषण विभागांनी कोणतीही दखल घेतली नाही. अधिकारी ज्या कामासाठी बसले ते काम का करत नाही?? बल्लारपुर शहरात एवढे प्रदुषण वाढले मग प्रदुषन विभागाला दिसत नाही काय?? कामगारांच्या समस्यावर काम करण्याकरीता सहा. कामगार आयुक्तांना चंद्रपुर मध्ये बसविले की कशासाठी?? खाजगी कंपन्यामध्ये भेट देऊन कधी कामगारांचे बयान नोंदवितात काय?? की फक्त मैनेजमेंट ला भेट देतात?? असे अनेक प्रश्न प्रियाताई झांबरे यांना उद्धभवले.
या कारणास्थव प्रियाताई झांबरे यांनी फार मोठा निर्णय घेतला. पेपरमील मैनेजमेंट, जिल्हाधिकारी चंद्रपुर, शासन प्रशासन जर गाढ झोपेत असतील तर फरक पडणार नाही. ठेकेदारी कामगारांच्या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा उद्या दिनांक २८ डिसेंबर २०२२ पासुन अन्नत्यागच नाही तर पाणी त्याग पण करणार याची दखल पेपरमील चे व्यवस्थापक, जिल्हाधिकारी चंद्रपुर, शासन प्रशासनाने घ्यावी असे प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले.