श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ब्रम्हपुरी,दि.३१/१२/२०२२
अखिल भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अंतर्गत तालुका शाखा ब्रम्हपुरी येथे एकाच दिवशी एकाच वेळी आठ गांवात धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.१५.१२.२०२२ते२४.१२.२०२२ या कालावधीत मेंडकी,गांगलवाडी,चौगाण, पिंपळगाव (भोसले),बोंडेगाव,रूई पाचगाव निलज,वायगांव आणि कोलारी या ठिकाणी भव्य धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या करिता प्रशिक्षित केंद्रीय शिक्षिका यांनी सतत दहा दिवस धम्माबाबत प्रशिक्षित केले. प्रशिक्षणाचे आयोजन आयु. झगळीदास रामटेके संस्कार सचिव चंद्रपूर जिल्हा पुर्व,आयु.इंजि.मोहन नंदेश्वर अध्यक्ष,आयु.अनिल वाळके उपाध्यक्ष,आयु.रवी गणविर,आयु.देवानंद मेश्राम,आयु.सुधाकर पोपटे,आयु.दादाजी मेश्राम,आयु.डाॅ.प्रेमलाल मेश्राम, आयु.नारायण उके,आयु.हिरामन मेश्राम, आयु.कमलेश मेश्राम,आयु.काकाजी मेश्राम,आयु.मंजुताई रायपुरे,आयु.रागिनि मेंढे,आयु.विद्या सुखदेवे,आयु.सुनंदा सोडवले.आयु.किशोर मेश्राम, इत्यादी ने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.