कापसाच्या ढिगा-याला आग – अज्ञात इसमा विरूदध गुन्हा दाखल

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
मूल,दि.२१/१२/२०२२

शेतशिवारात उभ्या असलेल्या कापसाच्या ढिगा-याला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना शनिवारी दुपारी मरेगाव येथे घडली.आगीत कापूस जळून खाक झाला. यात शेतक-याचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आंध्रप्रदेशातील नरसीपेठ येथील माधवी कोमटनिधी हा कापसाच्या शेतीसाठी सावली तालुकयातील चारगाव येथे स्थायीक झाला. त्याने चिमढा येथील लोनबले यांची पंधरा एकर शेती कापसाच्या लागवडीसाठी भाडयाने घेतील. यंदा कापसाचे पीक जोमदार आले.त्यामुळे वेचणी झालेल्या कापसाचा ढिगारा शेतात उभा होता.कापूस व्यापा-याला विकण्याच्या तयारीत होता.त्याआधीच अज्ञात इसमाने त्या कापसाच्या ढिगा-याला आग लावली.त्यात कापूस पूर्णता जळून खाक झाला. जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शेती करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोमटनिधी हा स्थायिक झाला होता. परंतु त्याच्या मेहनतीवर अज्ञात इसमाने पाणी फेरले.घडलेल्या घटनेमुळे त्याच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतकरी शनिवारी दुपारी शेतात गेला असता कापसाच्या ढिगा-याला आग लागून कापूस पूर्णता जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात इसमाविरूदध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.