वाघाच्या हल्ल्यात आणखी एक महिला ठार.  – शेतशिवारातील घटना 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

नागभीड,दि.३१/१२/२०२२

नागभीड तालुक्यात येत असलेल्या इरवा येथिल रहिवासी असलेली महीलेवर वाघाने शुक्रवारला सकाळी नऊ वाजता दरम्यान शेतशिवारात हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना घडली असतांना या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शेतावर शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या आणखी एका महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना ब्रम्हपुरी-नागभीड सीमेलगत असलेल्या टेकरी जवळ शनिवारी संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान घडली.या घटनेने नागभीड ब्रम्हपुरी तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून वनविभागाविषयी प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सीताबाई रामजी सलामे (५५) असे शनिवारी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नर्मदा प्रकास भोयर या महिलेस शुक्रवारी सकाळी ८.३० च्या दरम्यान वाघाने हल्ला करून ठार केले होते.सीताबाईही शनिवारी शेतावर शेंगा तोडण्यासाठी गेली होती.यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने शेंगा तोडत असलेल्या सीताबाईवर अचानक हल्ला केला.या हल्ल्याने घाबरून गेलेल्या सीताबाईने धावा धावा असा आरडाओरडा केला.मात्र आजूबाजूला असलेले लोक लांब असल्याने मदत मिळण्यास विलंब झाला.यात ती जागीच गतप्राण झाली. जिवाच्या भीतीने अनेक लोकांनी शेतीकडे जाणे सोडले आहे , उभ्या असलेल्या पिकांचे रक्षण करण्याची हि वेळ असून ,आता शेतकऱ्यांना स्वतःचे रक्षण करणे गरजेचे झाले आहे , वनविभागाचे कर्मचारी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल गावकरी करू लागले आहेत , लोकांचे जीव जात असतांना  वनविभाग मात्र त्याचे नुकसान भरपाई देण्यातच धन्यता मानत आहे असे दिसून येत आहे , आणि लोकांना  मात्र कायद्याच्या भीतीपोटी आपल्या  लोकांचा जीव जातांना बघितल्याशिवाय पर्याय नाही.   tiger attack,one death