उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने केलेले आरोप बिनबुडाचे, सरपंच सेवा महासंघ संघटना चा आरोप

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

तळोधी बा,दि.१७/०१/२०२३

जिल्हा परिषद चंद्रपूर चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे यांच्या वर ग्राम संवाद सरपंच संघ व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने खोटे आरोप करण्यात आलेले असून या मागणीत कुठल्याही प्रकारची सत्यता नसून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जनतेच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर राहून सहकार्य करीत असतात. त्यामुळे त्यांच्या होत असलेल्या चौकशी ला स्थगिती देण्याची मागणी सरपंच सेवा महासंघ जिल्हाध्यक्ष हेमंत लांजेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
ग्रामपंचायत च्या विकास कामात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून नेहमी च सहकार्य मिळत असे. चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच यांना विकास कामे करण्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मदत केली जात असताना काही संघटनेच्या लोकांनी ग्राम संवाद सरपंच संघाशी हातमिळवणी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तरी सरपंच सेवा महासंघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यशैली वर खुष असून त्याला आपले पाठिंबा देत आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देते वेळी सरपंच सेवा महासंघ जिल्हाध्यक्ष हेमंत लांजेवार, नागभीड तालुका सरपंच सेवा महासंघ उपाध्यक्ष अमोल बावनकर,गंगासागर हेटीचे सरपंच दिलीप गायकवाड, सरपंच गणेश गङडमवार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.